close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'चांद्रयान-२'च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर बॉलिवूडकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

इस्त्रोच्या कामगिरीला बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सलाम केले आहे.

Updated: Jul 22, 2019, 06:33 PM IST
'चांद्रयान-२'च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर बॉलिवूडकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : 'चंद्रयान २' च्या प्रक्षेपणाची वाट संपूर्ण भारत देश वाट पाहत होता. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतिश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून 'चांद्रयान २' अवकाशात झेपावलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'जीएसएलव्ही एम के ३' या प्रक्षेपकानं उड्डाणानंतर बरोबर १५ मिनिटांनी चांद्रयानाला त्याच्या नियोजित कक्षेत नेऊन सोडलं. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. 'चांद्रयान २'च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर बॉलिवूडकरांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे. 

इस्त्रोच्या कामगिरीला बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सलाम केले आहे. अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री तापसी पन्नू आणि विद्या बालन यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.