मुंबई : आर्यन खानच्या अटकेनंतर खान कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. 2 ऑक्टोबर पासून आर्यन ड्रेग्स केस प्रकरणात अडकाला आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आर्यन खानची बहिण सुहाना खानची प्रकृती चिंताजनक आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. जेव्हा तिला आर्यनच्या अटकेबद्दल माहिती मिळाली तेव्हा ती भारतात येणार होती.
पण शाहरुख खान आणि गौरीने तिला भारतात येण्यास नकार दिल्याचं समोर येत आहे. रिपोर्टनुसार ती सतत आई-वडिलांकडून आर्यनबद्दल माहिती घेत आहे. शिवाय आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती बिघडली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे शाहरुख आणि गौरी आर्यनला जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत.
असेही समोर येत आहे की, शाहरुख आणि गौरीचा लहान मुला अब्रामच्या जीवनावर परिणाम होत आहेत. कारण घडत असलेला प्रकार समजण्यासाठी तो खूप लहान आहे. खान कुटुंबातील प्रत्येक सदस्य घटनेमुळे अस्वस्थ आहे. अब्राम बहुतेक वेळा त्याच्या मित्रांसह दिसतो.
आर्यनच्या जामीन अर्जावर गुरूवारी होणार सुनावणी
आर्यनच्या बेल वर आज सुनावणी होणार आहे. आज 12 वाजता सुनावणी होणार असून एनसीबीचे वकील युक्तीवाद सुरु ठेवतील. आज 5 वाजे पर्यंत जर निर्णय आला नाही तर पुढील 5 दिवस कोर्ट बंद आहे.