Tunisha Sharma Death: 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) जगाचा निरोप घेतला. तिच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तिच्या निधनामुळे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत. या प्रकरणाला वेगळं वळण मिळत असल्याचे सांगितलं जात आहे. इतकं मोठं टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं प्रकरण आहे तरी काय? असे सगळेच वेगवेगळा अंदाज बांधत असताना तिचा सहकलाकार या प्रकरणात असल्याचे समोर येत आहे.
अली बाबा या मालिकेत काम करणारा तुनिषा शर्माचा सहकलाकार शीझान मोहम्मद खान हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही या नात्याचा निरोप घेऊन वेगवेगळ्या मार्गाने जायायचे ठरवले होते. पण तुनिषाने शीझानच्या मेकरुममध्ये गळफास लावून जीवन संपवल्याने अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळाल्या. त्याच्या मेकअपरुमध्ये तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यामुळे एक नवीन अॅंगल समोर आला आहे. अनेकांना शीझान मोहम्मद खान हा आहे तरी कोण असा प्रश्न पडला असेलच मग आज आम्ही तुम्हाला त्यांच्या कामाविषयी आणि त्याच्या जीवनाविषयी काही गोष्टींचा खुलासा करणार आहोत.
शीझान मोहम्मद खानचा (Sheezan Mohammed Khan) जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबई येथे झाला. त्याने टीव्ही मालिकांमधून स्वत:च्या करिअरला सुरुवात केली. त्याने झी टीव्ही मालिका, जोधा अकबर या मुराद मिर्झा/यंग अकबरच्या भूमिकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने कलर्स टीव्हीच्या सिलसिला प्यार का मध्ये विनय सक्सेनाच्या भूमिकेत काम केले. सध्या तो सब SAB टीव्हीच्या अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये अली बाबाची भूमिका साकारत आहे. शीझानला दोन मोठ्या बहिणी आहेत, फलक नाझ आणि शफाक नाझ त्या दोघींची नावं असून त्या दोघी टेलिव्हिजन अभिनेत्री आहेत. काही वर्षांपूर्वी शीझान तुनिषा शर्माच्या आधी 'कुंडली भाग्य' फेम मृणाल सिंगला डेट करत होता. तो गेल्या 10 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याने अनेक मोठ्या मालिकांमध्ये महत्तवाची भूमिका बजावून चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्यानं त्याच्या दमदार अभिनयाने स्वत:ची ओळख घरोघरी पोहचवली.
अनेकांना तुनिषा शर्माची हत्या की आत्महत्या? असा प्रश्न पडला असेल. याप्रकरणी पोलीस दोन्ही मार्गाने तपास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तुनिषाच्या आईने (Tunisha Sharma Mother) वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्ररीवरुन शीझानला ताब्यात घेतलं आहे. तुनिषाच्या मृतदेहावर रविवारी 25 डिसेंबर रोजी पोस्टमार्टम होणार आहे तेव्हा नेमकं कारण बाहेर पडेल अशीच सगळे अपेक्षा करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.