मुंबई : मुंबई... या विश्ननगरीत प्रत्येक जण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दाखल होतो. काहींच्या वाट्याला यश येतं तर काहींना अपयशाचा स्वीकार करावा लागतो. या स्वप्नांच्या नगरीत काहींचे स्वप्न पूर्ण देखील होतात. पण यशाकडे वाटचाल करत असताना अनेक अडचणी समोर येतात. अनेकदा या अडचणींचा सामना करता येत नाही आणि शेवटी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आलेला कलाकार मृत्यूला जवळ करतो. हिचं गोष्ट अधोरेखीत करणारा चित्रपट ‘Suicide or Murder' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘Suicide or Murder' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे. चित्रपटात अभिनेता सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
A boy from small town became a Shining Star in the film industry. This is his journey. Introducing @TiwariSachin_ as 'The Outsider' in #SuicideOrMurder @vsgbinge@VijayShekhar9 @shamikmaullik @shraddhapandit @vsgmusic #bollywood #SushantSinghRajput #nepotismbollywood pic.twitter.com/r20yUNlt0e
— VSG Binge (@vsgbinge) July 19, 2020
चित्रपटाची कथा फक्त सुशांतच्या जीवनावर बेतलेली नसुन, त्या प्रत्येक कलाकाराची आहे जो एकटा या कलाविश्वात आपलं नशिब आजमावण्यासाठी आला. पण बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीचा शिकार बनला. असं वक्तव्य विजय शेखरने झी न्यूजसोबत बोलताना केलं आहे.
सुशांतने ज्या परिस्थितीचा सामना केला आहे. मानसिक तणाव, त्याच्याकडून काढून घेण्यात आलेले चित्रपट अशा सर्व गोष्टींभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसणार आहे. 'हा चित्रपट फक्त एक बायोपिक नसून सुशांतचं जीवन प्रेरित करणार आहे. शिवाय या चित्रपटाच्या मध्यमातूम कलाविश्वातील अनेक बारकावे समोर येणार आहेत.' असं वक्तव्य चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केलं आहे.