Maha Daridra Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे आपलं असे वैशिष्ट्यं आहे. जमीन, शौर्य, सामर्थ्य आणि ऊर्जा यांचा कारक मंगळ ग्रह आपली स्थिती जून महिन्यात बदलणार आहे. प्रत्येक ग्रह आपल्या विशिष्ट वेळेनंतर आपली स्थिती बदतो. मंगळदेव दीड महिन्यानंतर मीन राशीतून स्वगृही मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ शनिवारी 1 जून 2024 ला दुपारी 03:27 वाजता गोचर करेल. मीन राशीत राहू आणि मंगळ मिलनातून तयार झालेला अंगारक योग संपुष्टात येईल. पण मेष राशीत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीत प्रवेश केल्यानंतर अशुभ असा महा दरिद्र योग निर्माण होणार आहे. या योगामुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल असं ज्योतिषचार्य आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. (maha daridra yog formed in mesh rashi 1 june Crisis will these zodiac signs people )
ज्योतिशास्त्रानुसार या राशीच्या लोकांच्या कुंडलीत मध्यभागी मंगळ बसला असणार आहे. तर कुंडलीच्या सहाव्या घरातील स्वामी बुध, शुक्र आणि बृहस्पति धनाच्या घरात विराजमान असल्याने अशा स्थितीत महा दरिद्र योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या कामात अडथळे येणार आहेत. तसंच, नोकरदारांच्या पदोन्नतीला ब्रेक लागणार आहे. हा योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांचा खर्च वाढणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह 12 व्या घरात तर शुक्र, गुरू आणि मंगळ हे बाराव्या घरात विराजमान आहेत. यामुळे केंद्र आणि त्रिकोणाचे स्वामी एकत्र बसल्यास महा दरिद्र योग निर्माण होणार आहे. जे मिथुन राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरणार आहे. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
मंगळ कर्क राशीच्या दहाव्या घरात स्थित असून गुरू, बुध, शुक्र आणि राहू लाभ स्थानावर असणार आहे. अशा स्थितीत कर्क राशीच्या लोकांसाठी महा दरिद्रा राजयोग घातक ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महा दरिद्र योगामुळे कर्क राशीच्या लोकांना कोणत्याही कामात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अन्यथा व्यवसायात नुकसान सहन करावा लागेल. नात्यांमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)