Sunil Shetty Injured : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा त्याचा आगामी चित्रपट 'हंटर'च्या सेटवर अपघात झाला. त्याच्या शूटच्या दरम्यान, काही स्टंट करत असताना सुनील शेट्टीला दुखावत झाली आहे. या दरम्यान, त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. स्वत: सुनील शेट्टीनं त्याची आता अवस्थता कशी आहे त्याविषयी माहिती दिली. त्यानं सांगितलं की त्याला गंभीर दुखापत झालेली नसून तो आता ठीक आहे.
रिपोर्ट्सनुसार, सुनील शेट्टी हा चार ते पाच स्टंटमॅनसोबत एक हाय-इंटेंसिटी फाइट सीन करत होता. तेव्हाच एक दुर्घटना झाली. या सीनमध्ये लाकड्याच्या लॉगला वापरण्यात आलं. यावेळी सीन शूट करत असताना तो लॉग सरकला आणि सुनील शेट्टीच्या बरगड्यांवर जाऊन पडला. या घटनेत सुनील शेट्टीला दुखापत झाली. सुनील शेट्टीला या दरम्यान, गंभीर दुखापत झाली. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, एका सुत्रानं सांगितलं की सुनीलला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला नक्की किती दुखापत झाली हे तपासण्यासाठी डॉक्टर आणि एक्स-रे मशीन सेटवर बोलवण्यात आलं होतं. सुनील शेट्टीला अजूनही त्रास होतोय, मुंबईत जी शूटिंग सुरु होती तिला आता थांबवण्यात आलं आहे.
दरम्यान, सुनील शेट्टीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं की छोटीशी दुखापत आहे. काही गंभीर झालेलं नाही! मी ठीक आहे आणि पुढच्या शॉटसाठी तयार आहे. सगळ्यांच्या प्रेम आणि काळजीसाठी मी आभारी आहे. वेब सीरिजच्या सेटवर छोटीशी दुखापत झाल्याचं सुनील शेट्टीनं स्पष्ट केलं.
हेही वाचा : अर्जुन कपूर 'या' गंभीर आजारानं त्रस्त; म्हणाला - 'मी कधी मोकळेपणानं बोललो नाही कारण...'
सुनील शेट्टीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अक्षय कुमार, दिशा पटानी, परेश रावल, जॅकलीन फर्नांडीस, लारा दत्ता, रवीना टंडन, अरशद वारसी आणि श्रेयस तळपदे देखील दिसणार आहे. हा चित्ररट 20 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे.
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.