सनी लिओनीचा फोटोशूट व्हीडिओ व्हायरल

 सनी बहुतेक वेळा तिचं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करते आणि तिच्या फोटोशूटची चर्चा देखील होते. तिचे फोटो किंवा व्हीडिओ

Updated: Mar 4, 2021, 10:49 AM IST
सनी लिओनीचा फोटोशूट व्हीडिओ व्हायरल title=

मुंबई : सनी बहुतेक वेळा तिचं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करते आणि तिच्या फोटोशूटची चर्चा देखील होते. तिचे फोटो किंवा व्हीडिओ सोशल मीडियावर येता बरोबर व्हायरल होतात. असाच एक फोटोशूटचा व्हीडिओ सनीने शेअर करताच व्हायरल झालाय. सनीचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचा हा व्हीडिओ चाहत्यांना भुरळ घालत आहे.

या व्हीडीओत सनी ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली होती. सनीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोशूट व्हिडिओमध्ये सनी एका ग्लॅमरस स्टाईलमध्ये झोक्यावर उभी राहून पोज देत आहे. 

ब्लॅक आउटफिटमध्ये सनीची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. तिचे चाहते तिच्या पसंती आणि तिच्या फोटोला खूप प्रेम देत आहेत. शेअर केलेल्या व्हीडिओला सनीने आकर्षत कॅप्शनदेखील दिली आहे. 'बॅक ईन ब्लॅक'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

लवकरच सनी लिओनी टीव्ही शो स्प्लिट्सविला 'एक्स 3'मध्ये दिसणार आहे. यासोबत तिच्या फॅन्सना तिचा फॅशन सेन्सही प्रचंड आवडतो. सनी लिऑनला बिग बॉसच्या पाहिल्या भागात आपण सर्वांनीच पाहिलं होतं. त्यानंतर तिने यशाच्या पायऱ्या गाठायला सुरुवात केली.

या व्यतिरिक्त तिने रईस या चित्रपटातील  'लैला' या डान्संमुळे चाहत्यांची मने जिंकली. सनी लिओनी लवकरच 'कोका कोला', 'रंगीला' आणि 'वीरमादेवी' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. यासह सनी लिओनी देखील अनामिकामध्ये दिसणार आहे.