अजूनही वाट पाहतोय... सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीची भावुक पोस्ट

या दुःखातून बाहेर पडणं कुटुंबियांना अशक्य 

Updated: Mar 4, 2021, 09:54 AM IST
अजूनही वाट पाहतोय... सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीची भावुक पोस्ट title=

मुंबई : सुशांतसिंह राजपूत (Sushant Sing Rajput) ची बहिण श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) आजही आपल्या भावाच्या आठणीने व्याकूळ होत आहे. तिने बुधवारी एकं ट्विट करून आपली भावना व्यक्त केली आहे. श्वेताने या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'सुशांतच्या मृत्यूमागील रहस्यमय सत्य जाणून घेण्यासाठी तिचे कुटुंब धीराने वाट पाहत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये वांद्र्याच्या अपार्टमेंटमध्ये ३४ वर्षीय अभिनेता मृत अवस्थेत आढळला होता.

श्वेताने काढली  सुंशातची आठवण

श्वेता सिंह किर्ती यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, 'धीराने याचा समानार्थी आहे - राग न येता संयम राखून, त्रास स्वीकारण्याची किंवा सहन करण्याची क्षमता.' श्वेता सिंह किर्ती बहुतेक वेळा तिचा भाऊ सुशांतच्या आठवणीत पोस्ट करते. तिने आपले जुने फोटो आणि सुशांतसोबत घालवलेले खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करते. सुशांतचे कुटुंब आणि त्याचे चाहते अद्यापही सुशांतच्या जाण्याच्या धक्क्यातून बाहेर आलेले नाही.

श्वेताने लिहिली कविता

कॅलिफोर्नियामधील डिझायनर श्वेता सिंह किर्तीने तिचा दिवंगत भाऊ सुशांत यांच्या निधनाची व्यथा व्यक्त करण्यासाठी एक कविता लिहिली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर काही दिवसांनंतर त्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता, परंतु अद्याप एजन्सीने मृत्यूमागील कारणांचा खुलासा केला नाही.

अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक खुलासे

 सुशांतसिंह राजपूतने गेल्या वर्षी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह सुशांतच्या मुंबईतील निवासस्थानी आढळला. यावेळी कुटुंबातील कोणीही सदस्य त्याच्याबरोबर नव्हते. या प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे. त्याचबरोबर एनसीबी (NCB) सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणातही कारवाई करीत आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रीटीची नावेही समोर आली आहेत.