सोसायटीतून हकालपट्टीनंतर सुशांत सिंह राजपूत लिव-इनमध्ये?

तथाकथित प्रेयसीसोबत सुशांत लिव-इनमध्ये राहत असल्याचं म्हटलं जात आहे

Updated: Nov 13, 2019, 07:20 PM IST
सोसायटीतून हकालपट्टीनंतर सुशांत सिंह राजपूत लिव-इनमध्ये?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत राहतं घर सोडल्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यानं फक्त घर सोडलं नाही तर, रिया चक्रवर्तीच्या घरी तो राहण्यासाठी गेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुशांत आणि रियाच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्याचप्रमाणे हे दोघे आता लिव-इनमध्ये राहत असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. 

स्पॉटबॉयच्या वृत्तनुसार सुशांतला त्याच्या घरातून सामान घेवून जाताना कैद करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी सोसायटीच्या वॉचमॅनकडे विचारणा केली असता, त्याच्या नेहमीच्या पार्ट्यांमुळे रहिवासी त्रासले होते. 

एवढंच नाही तर सोसायटीच्या रहिवाश्यांनी रीतसर याप्रकरणी तक्रार देखील केली होती. म्हणूनच आपलं राहतं घर सोडून तो त्यांच्या गर्लफ्रेंडच्या घरी राहण्यासाठी गेला आहे. 

सुशांत सिंग राजपूत सध्या 'दिल बेचारा' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. शिवाय त्यांचा 'ड्राइव्ह' चित्रपट देखील अंतीम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे अभिनेता इम्रान हश्मीसोबत 'चेहरे' चित्रपटात देखील झळकणार आहे.