VIDEO : जेव्हा दोन सुंदऱ्या एकमेकांसमोर येतात...

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झालेला दिसतोय. यामध्ये माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि नुकतीच मिस वर्ल्डचा खिताब पटकावणारी मानुषी छिल्लर दिसत आहेत.

Updated: Dec 1, 2017, 04:33 PM IST
VIDEO : जेव्हा दोन सुंदऱ्या एकमेकांसमोर येतात...  title=

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झालेला दिसतोय. यामध्ये माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि नुकतीच मिस वर्ल्डचा खिताब पटकावणारी मानुषी छिल्लर दिसत आहेत.

प्रवासादरम्यान विमानात सुष्मिता आणि मानुषी यांची अचानक भेट झाली. व्हिडिओत दोन ब्युटी क्वीन्स एकमेकांची कंपनी चांगलीच एन्जॉय करताना दिसतायत...

या व्हिडिओत सुष्मिता मानुषीला प्रोत्साहन देताना दिसतेय. 

Sush & Miss Word 2017 Manushi Chhillar #sushmitasen #manushichillar

A post shared by Sushmita Sen Fanpage (@voguesush) on

१९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकलेल्या सुष्मितानं २० वर्षांच्या मानुषीचं ट्विटरवर तिच्या विजयासाठी अभिनंदन केलं होतं.

'मानुषी तू माझा वाढदिवस स्मरणीय ठरवलास... भारताला तुझ्यावर अभिमान आहे. तू खरोखरच महान बनण्यासाठी, मिस वर्ल्ड २०१७ चा खिताब आपल्या नावावर करण्यासाठीच जन्मलीस... तुझं हास्य माझ्या आठवणीत आहे. तुझी यात्रा जगाला प्रोत्साहन देण्यासाठीच आहे' असं म्हणत सुष्मितानं मानुषीवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.