मुंबई : 'जाडी' ही मला कधी शिवी वाटत नाही, पण माझ्या शरीरावर कोणी कमेंट करण हे मला आवडत नाही असे विधान अभिनेत्री विद्या बालन हिने केले आहे.
शुक्रवारी अजेंडा 'आज तक २०१७' च्या कार्यक्रमात ती बोलत होती.
'तुम्हारी सुलू'मधील विद्याच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. या सिनेमात तिने मध्यमवर्गीय गृहीणीची भूमिका केली आहे. या गृहीणीचा आर.जे बनण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखविण्यात आला आहे.ृ
'तुम्हारी सुलू' च्या भरघोष यशानंतर तिच्या बॉडी फिटनेसबद्दल चर्चा रंगू लागली आहे. कोणत्याही इव्हेंट, पार्टीला गेल्यावर माझ्या वजनाबद्दल चर्चा व्हायची असे विद्याने सांगितले.
जाडी म्हणून कोणी हिणवल्यास मला ती शिवी वाटत नाही.पण मला कोणी हिणवलेले आवडत नसल्याचे तिने सांगितले. कोणाला दुसऱ्या बद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कोणी चांगले दिसत असेल तर नक्की सांगा.
जेव्हा कोणती महिला यशस्वी होते तेव्हा लोक असे बोलून तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात असेही तिने यावेळी सांगितले.
मी जेव्हा २० वर्षाची होते तेव्हा वडिलांसोबत टीव्ही शोच्या ऑडिशनला गेली होती. तिथे कास्टिंग डायरेक्टर माझ्या ब्रेस्टकडे बघत होता. मी त्याला सरळ विचारले, काय बघतोयस ?
ते ऐकून तो थोडा घाबरला. त्याने मला 'ऑफर' केली पण मी नाही म्हटले.
या घटनेनंतर मी इंडस्ट्रीतल्या कोणत्या शोषणाचा शिकार झाले नाही.