...अन् सुष्मिता सेन ताजमहालसमोर बेशुद्ध पडली, डिझायनरने 30 वर्षांनी केला खुलासा

डिझायनर रितू कुमार (Ritu Kumar) यांनी इंस्टाग्रामला (Instagram) जुन्या आठवणी ताज्या करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सुष्मिता सेन (Sushmita Sen) ताजमहालसमोर (Taj Mahal) फोटोशूट करताना दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: May 1, 2024, 03:30 PM IST
...अन् सुष्मिता सेन ताजमहालसमोर बेशुद्ध पडली, डिझायनरने 30 वर्षांनी केला खुलासा title=

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा (Miss Universe) खिताब जिंकली होती. याचवर्षी ताजमहालच्या (Taj Mahal) समोर तिचं फोटोशूट करण्यात आलं होतं. डिझायनर रितू कुमार (Ritu Kumar) यांनी सुष्मिता सेनच्या फोटोशूटमधील व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना 'सुष्मिता सेनचं मिस युनिव्हर्स फोटोशूट' अशी कॅप्शन दिली आहे. यासह त्यांनी काही जुन्या आठवणींना ताजं केलं आहे. त्यावेळी झालेली धावपळ आणि व्यग्र वेळापत्रकाने बेशुद्ध पडलेला सुष्मिता यांच्याबद्दल सांगितलं आहे. 

"1993 मध्ये, मी मिस इंडिया टीमसोबत स्पर्धकांसाठी कपडे डिझाइन करण्याचा करार केला होता. 1994 मध्ये सुष्मिता सेन मिस इंडिया झाली आणि त्यानंतर अमेरिकेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. हा एक ऐतिहासिक क्षण होता आणि स्पर्धकांसाठी कपडे तयार करण्याच्या मिस इंडियासोबतच्या कराराचा एक भाग म्हणून मला तिचा वॉर्डरोब तयार करण्याचं काम सोपवण्यात आलं. मी तिला बांधणी आणि जरदोजी, कुर्ता- पायजमा, साड्या असे वेगवेगळे प्रकारचे कपडे पाठवण्यास सुरुवा केली. त्यांना खरोखरच चांगला प्रतिसाद मिळाला," असं रितू कुमार यांनी सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritu Kumar (@ritukumarhq)

रितू कुमार यांनी यावेळी शूटवेली नेमकं काय झालं आणि त्यांनी कशाप्रकारे सुष्मितासाठी गुलाबी साडी मिळवली याबद्दलही सांगितलं. सुष्मिता सेन शूटदरम्यान बेशुद्ध पडली होती असा खुलासाही त्यांनी केला. "दौऱ्यानंतर जेव्हा ती दिल्लीत आली तेव्हा मला ताज पॅलेसमध्ये येण्यासाठी एक फोन आला. पोहोचल्यावर मला टीमने दुसऱ्या दिवशी ताजमहालच्या बाहेर शूटिंग होणार असल्याची माहिती दिली. पण पाठवलेले कपडे शॉर्ट्स आणि टी- शर्ट हे ताजमहालच्या बाहेर घालण्यासाठी फारच आक्षेपार्ह होते. नंतर आम्ही रात्री दुकान उघडलं आणि एक गुलाबी साडी शोधली. इतरी महत्वाचे कपडे, दागिने आम्ही शोधले आणि काही तासांतच शूटिंगसाठी तयार झालो. शूट खूप व्यस्त झाले. एका क्षणी सुष्मिता बेशुद्दही झाली. पण ते फोटो पाहिल्यानंतर मेहनतीचं चीज झालं होतं," असं रितू कुमार यांनी सांगितलं. 

रितू कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, "सुष्मिताने नेसलेली गुलाबी साडी आणि त्यावर परिधान केलेला मुकुट आणि उत्तर प्रदेश पोलीस कर्मचारी अभिमानाने टाळ्या वाजवतानाच्या त्या क्षणाचा मी विचार करते! हे फोटो देशभरातील अग्रगण्य प्रकाशनांमध्ये पसरवल्या गेल्या ज्याचे श्रेय आम्हाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विणकरांना आहे".

मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिता सेनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बीवी नंबर 1, डू नॉट डिस्टर्ब, मैं हूं ना, मैने प्यार क्यूं किया, तुमको ना भूल पायेंगे आणि नो प्रॉब्लेम यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय एमी-नॉमिनेटेड आर्या या वेब सिरीजमधून तिने अभिनयात पुनरागमन केलं. तिसऱ्या सीझनमध्ये ती अखेरची दिसली होती.