भावूक सुष्मिताची श्रीदेवींना अनोख्या पद्धतीनं आदरांजली

श्रीदेवी यांच्या अचानक निधनानं त्यांच्या अनेक फॅन्सना मोठा धक्का बसला. अनेक सेलिब्रिटीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली देत आहेत. अशावेळी अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं एक मेसेज सोशल मीडियावर शेअर करत अनोख्या पद्धतीनं श्रीदेवी यांना आदरांजली दिलीय.

Updated: Mar 1, 2018, 05:01 PM IST
भावूक सुष्मिताची श्रीदेवींना अनोख्या पद्धतीनं आदरांजली title=

नवी दिल्ली : श्रीदेवी यांच्या अचानक निधनानं त्यांच्या अनेक फॅन्सना मोठा धक्का बसला. अनेक सेलिब्रिटीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली देत आहेत. अशावेळी अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं एक मेसेज सोशल मीडियावर शेअर करत अनोख्या पद्धतीनं श्रीदेवी यांना आदरांजली दिलीय.

भावूक झालेल्या ब्युटी क्वीन सुष्मितानं सोशल मीडियावर आपल्या एका मैत्रिणीनं पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. मेसेजमध्ये रुची नावाच्या तिच्या मैत्रिणीनं म्हटलंय 'हलो, मी फक्त तुझी परिस्थिती जाणून घेण्यासा्ठी कॉल केला. मला माहीत आहे की श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे तुला खूप दु:ख झालं असेल... तू सुरुवातीपासूनच त्यांची फॅन आहेस. आठवतंय, त्यांच्या चांदनी सिनेमातल्या मेरे हाथों मे ... गाण्यावर तुझा डान्स परफॉर्मन्स... स्वत:ची काळजी घे... लव्ह यू... मिस यू'

श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु, सर्वांनाच याचं दु:ख राहील की आपल्या मुलीचा पहिला - वहिला सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी मात्र ह्यात नाहीत. २८ फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.