हळदी समारंभात Suyash Tilak चा होणाऱ्या पत्नीसोबत रोमान्स

अभिनेता सुयश टिळकने आयुषी भावेसोबत काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला. 

Updated: Oct 20, 2021, 12:04 PM IST
हळदी समारंभात Suyash Tilak चा होणाऱ्या पत्नीसोबत रोमान्स

मुंबई : अभिनेता सुयश टिळकने आयुषी भावेसोबत काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला. आपल्या होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसादिवशी सुयशने ही खास घोषणा केली होती. आता ही जोडी लग्नाच्या तयारीत आहे. लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतेच सुयश आणि आयुषीचे हळदीसमारंभाचे फोटो व्हायरल होत आहेत. 

सुयश टिळक हा मराठमोळा अभिनेता आहे, तर आयुषी भावे एक डान्सर आहे. आयुषी युवा डान्सिग क्वीन या शोमधून घराघरात पोहोचली. दोघांची हळदी समारंभात कशी धमाल सुरु होती हे या फोटोतून दिसून येत आहे. 

सोबतच या जोडीची केमिस्ट्रीचं ही चाहत्यांना फार आवडते आहे. लवकरच आयुषीचा आगामी सिनेमा येणार आहे. साखरपुड्यानंतर केळवणातले फोटोदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

आयुषीच्या मेहंदी समारंभाला ही सुरुवात झाली आहे. तिच्या हातावर सुयशच्या नावाची मेहंदी चढली आहे. 

साखरपुड्यानंतर सुयशची इंस्टाग्राम पोस्ट 
सुयशने आपल्या इंस्टाग्राममध्ये लिहिलं आहे की,'माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. हॅप्पी बर्थ डे लव....आणि त्याने ही पोस्ट आयुषी भावेला टॅग केली आहे. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली. सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालोय. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने व प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय. ज्यांनी आमचा हा क्षण अतिशय खास बनवला त्या सगळ्या मित्रपरिवाराचे आणि कुटुंबियांचे मनापासून आभार