पवनदीप आणि अरुणिता प्रेमात मग्न; विचारतो 'मंजूर है'?

पवनदीप म्हणतो,  'मान्य आहे तुम्हाला आमचा नवा प्रवास?'

Updated: Oct 20, 2021, 12:00 PM IST
पवनदीप आणि अरुणिता प्रेमात मग्न; विचारतो 'मंजूर है'?

मुंबई : 'इंडियन आयडल 12' फेम अरूणिता कांजिलाल आणि पवनदीपने त्यांच्या गोड आवाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे. आता अरुणिता-पवणदीपचं नवं गाणं 'सैय्योनी' रिलीज झालं. 'इंडियन आयडल' शोनंतर त्यांचा प्रवास पुढे सुरू आहे. 'सैय्योनी' गाण्यानंतर त्यांचं आणखी एक गाणं रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी तयार झालं आहे. त्यांच्या नव्या  गाण्याची चर्चा सध्या तुफान रंगली आहे. अरुणिता आणि पवनदीपच्या नव्या गाण्याचं नाव आहे 'मंजूर दिल...'

'मंजूर दिल...' गाण्याचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. टीझरमध्ये अरुणिता आणि पवनदीप एकमेकांच्या प्रेमात मग्न असल्याचं दिसत आहे. पवनदीपने सोशल मीडियावर गाण्याचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये  'मान्य आहे तुम्हाला आमचा नवा प्रवास?' असा प्रश्न विचारला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pawandeep Rajan (@pawandeeprajan)

दरम्यान, पवनदीप-अरूणिताच्या नव्या गाण्याला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 2021 मधील सर्वात जास्त ट्रेंडिंग जोडी आता गायक हिमेश रेशमियासोबत काम करत आहे. हिमेश लिखीत बोल आणि पवनदीप-अरूणिताच्या आवाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे.