का रडू लागली स्वरा भास्कर ढसाढसा? व्हिडिओ होतोय व्हायरल

स्वरा भास्करने एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिलं की, माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी  माझा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला होता

Updated: Apr 9, 2021, 04:26 PM IST
का रडू लागली स्वरा भास्कर ढसाढसा? व्हिडिओ होतोय व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते आणि तिचे मित्र तिला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, तिने आपल्या इन्स्टाग्राम अकांउन्टवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत ती केक कापताना दिसत आहे. तिच्या वाढदिवसाच्या आधीच, तिच्या कुटुंबीयांनी तिला एक सरप्राईज दिलं आहे. हे सरप्रईज पाहून स्वरा खूप भावनिक झाली आणि रडू लागली.

स्वराने स्वत:ला  भाग्यवान संबोधते
स्वरा भास्करने एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिलं की, माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी  माझा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला होता, माझा वाढदिवस सुरु होण्याआधीच माझ्या घरातल्या मंडळीनी माझा वाढदिवस साजरा करत मला सरप्राईज दिलं. अशा प्रकारचे पालक आणि मित्रांचं कुटुंब असल्याने मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

सोनम कपूरने  दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सोनम कपूरने स्वराच्या वाढदिवशी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलं आहे की, ''प्रिय बहिणी, आपण फक्त एकदाच बोललो आहोत आणि असं वाटतंय की, ही मैत्री देवाने खूप वर्षांपूर्वीच केली आहे.

साक्षी, बिंदिया आणि चंद्रिका या ज्या तू भूमिका निभावल्या आहेत त्या अप्रतिमच आहेत. परंतू मला जर कोणी विचारलं स्वराची तुझी आवडती भूमिका कोणती तर मी सांगेन मला तिची ऑफस्क्रीन भूमिका फार आवडते. वेळेसोबत तुझा आवाज बुलंद होवू देत. भरपूर प्रेम. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.'' यावर स्वराने उत्तर दिले आहे की, ''सोनम, लव यू.. तू बेस्टेस्ट आहेस''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

याचबरोबर स्वराचे वडील उदय भास्कर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यांनी मुलगी स्वरासाठी एक मोठं पत्र लिहिलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, खरतर आम्हाला याचं खूप वाईट वाटतंय की, आम्ही तुझ्या वाढदिवशी तुला भेटायला तिथे येवू शकत नाही. तुझ्याजवळ येवून तुला विष करु शकत नाही. तुझी आई तिच्या शोना राणीला मिठी मारू शकणार नाही. याचबरोबर त्यांनी सुरक्षित राहण्याचे आणि मास्क लावण्याबद्दल बोलले आहेत.