'मी हे सगळं जवळून ...' मल्याळम इंडस्ट्रीतील लैंगिक अत्याचारावर स्वरा भास्करचा खुलासा

Swara Bhaskar on Sexual Abuse Malayalam Industry: मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतून समोर आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. अभिनेत्रींसोबत होणारे गैरवर्तन, बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे खुलासे एकामागून एक होत आहेत. काही जणांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्वरा भास्करने MeToo चळवळीवर भाष्य केले आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 28, 2024, 04:32 PM IST
'मी हे सगळं जवळून ...' मल्याळम इंडस्ट्रीतील लैंगिक अत्याचारावर स्वरा भास्करचा खुलासा  title=

Swara Bhaskar on Sexual Abuse Malayalam Industry: कास्टिंग काउच आणि अभिनेत्रींसोबतच्या गैरप्रकारांची माहिती अनेकदा समोर येते. यामधून चित्रपटसृष्टीचं भयावह चित्र समोर येतं. याबाबत अनेक अभिनेत्रींनी त्यांचे भयानक अनुभव शेअर केले आहेत. मल्याळम सिनेसृष्टी गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींच्या आरोपामुळे चर्चेत आली आहे. सोबत केलेली वागणूक समोर आली आहे. हेमा समितीच्या अहवालावर स्वरा भास्करने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लैंगिक शोषणाच्या आरोपांनी मल्याळम इंडस्ट्री सध्या चर्चेचा विषय आहे. प्रतिक्रिया देताना स्वरा भास्करने ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी त्या लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. ज्यांना या सगळ्यातून जावे लागले. लोकांना या परिस्थितीचा सामना करावा लागला. 

हेमा समितीच्या अहवालावर स्वरा यांची प्रतिक्रिया

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वार यांनी लिहिले, 'हेमा समितीचा अहवाल वाचण्याची मला अखेर संधी मिळाली. सर्वप्रथम, मी विमेन इन सिनेमा कलेक्टिव्हचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी महिलांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. त्या स्त्रिया हिरो आहेत आणि तुम्ही उच्च पदावरील लोकांनी केलेल्या कामाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहात. अभिनेत्रीने पुढे लिहिले की, 'या समितीचा अहवाल वाचून मला खूप वाईट वाटले. मी ही परिस्थिती ओळखून आहे . हे सर्व मी जवळून पाहिले आहे. काही बारकावे आणि तपशील वेगळे असू शकतात, पण मला या सर्व घटनांची चांगलीच जाणीव आहे.

देवाशी तुलना केली जाते 

पुढे स्वरा लिहिते, 'ग्लॅमर जग नेहमीच पुरुष केंद्रित राहिले आहे. हा केवळ पितृसत्ताकच नाही तर ऑर्थोडॉक्स उद्योगही आहे. इथे यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शकांची तुलना देवाशी होऊ लागते. त्यांनी काहीही चूक केली तरी सर्व काही माफ आहे. जर कोणी आवाज उठवला तर त्याला ट्रबल मेकर म्हणतात आणि बाजूला केले जाते. चित्रपटसृष्टीत काम करणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे.