Varsha Usgaonkar : लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर या गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी 5' मुळे चर्चेत आहेत. या पर्वात सगळे स्पर्धक हे त्यांची रणनीती दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपण पाहत आहोत. रोज शोमध्ये वेगवेगळा ड्रामा पाहायला मिळत आहे. दरम्यान, या सगळ्यात वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या लग्नासंबंधीत एक मजेशीर किस्सा निक्की तांबोळीला सांगितला आहे.
वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं की त्यांना वाटत होतं की त्या लव्ह मॅरेज करतील. मात्र, त्यांच्या नशिबात काही दुसरंच होतं. त्यांच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा त्यांनी त्यांच्या नवऱ्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. याविषयी सविस्तर सांगत वर्षा उसगांवकर म्हणाल्या, लग्नाच्या आधी अजय शंकर शर्माचं वजन वाढलं. ते पाहता त्यांनी सुरुवातीला अजयशी लग्न करण्यास नकार दिला होता.
याविषयी सांगत वर्षा पुढे म्हणाल्या, सुरुवातीला जेव्हा अजय त्यांच्या घरी आले होते तेव्हा त्यांचं वजन खूप वाढलं होतं. तो थोडा लठ्ठ झाला होता. वर्षानं अजयला पाहिलं आणि त्यांना वाटलं की या व्यक्तिला त्या कधीच भेटल्या नाहीत. त्यांना पाहून वर्षा यांना असं वाटलं की या व्यक्तीसोबत त्या लग्न करू शकत नाही. सुरुवातीला त्यांच्या मनात हेच सुरु होतं.
त्यानंतर वर्षा यांनी अजय यांना सांगितलं की 'ते खूप बदलले आहेत.' त्यावर अजय यांनी उत्तर दिलं की हो, 'माझं वजन खूप वाढलं ना? पण तू अजूनही जशीच्या तशीच आहेस.' दरम्यान, वर्षा यांनी 2000 मध्ये अजय यांच्याशी लग्न केलं.
वर्षा उसगांवकर यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांनी 'तिरंगा', 'सुपर नानी', 'घर जमाई', 'दूध का कर्ज' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...
दरम्यान, बिग बॉसमध्ये वर्षा उसगांवकर यांना पाहणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी असलेली आनंदाची गोष्ट आहे. तर त्यांच्यात आणि जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीमध्ये झालेली भांडण ही सगळ्यांना माहितच आहे. त्यावरून त्यांना अनेकदा भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखकडून खडे बोल ऐकावे लागले. त्याचं कारण म्हणजे निक्की आणि जान्हवी सतत वर्षा यांच्या खासगी आयुष्यावर आणि कामावर वक्तव्य करताना दिसल्या.
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.