‘तारक मेहता’च्या असित मोदींना दणका, लैंगिक शोषण प्रकरणात अभिनेत्रीच्या पक्षात निकाल

असित मोदीच्या विरोधात लढतील या प्रकरणात  नवे वळण घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरु होता. 

Updated: Mar 26, 2024, 06:53 PM IST
‘तारक मेहता’च्या असित मोदींना दणका, लैंगिक शोषण प्रकरणात अभिनेत्रीच्या पक्षात निकाल title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये मिसेज रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारा टीव्ही अभिनेत्री जेनिफर मिस्त्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्रीने शोचे निर्माते  असित कुमार मोदी यांच्यावर शारिरीक शोषणाचा आरोप लावला होता. आता जेनिफरची असित मोदीच्या विरोधात लढतील या प्रकरणात  नवे वळण घेतलं आहे.  'तारक मेहता...' शो संबधित सेक्शुअल हैरासमेंट केसमध्ये  जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्या बाजूने निकाल देण्यात आला असून निर्माते असित मोदी यांना थकीत रकमेसह अभिनेत्रीला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जेनिफर मिस्त्री बंसीवालने शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर शारिरीक शोषणाचा आरोप लावला आहे. इतकंच नाही अभिनेत्रीने अजून दोघं एक्जीक्यूटिव प्रोड्यूसर जतिन बजाज आणि ऑपरेशन हेड सोहेल रमानी यांच्या विरोधातही तक्रार दाखल केली होती. पवई पोलिस्टेशनमध्ये अभिनेत्रीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पवई पोलिसांनी असित मोदी विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 354 आणि 509  अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणात बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री लढा देत होती. अखेर बऱ्याच दिवसांनंतर  अभिनेत्रीला न्याय मिळाला आहे. मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री मदत मिळाली नसल्याने तिने महाराष्ट्र सरकारकडे मदतीचा हात मागितला होता. ज्यामध्ये असित मोदी दोषी आढळला. त्यामुळे लगेजच त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

तारक मेहता का उल्टा चश्मा अभिनेत्रीने सांगितलं आहे की, असितला तिची थकबाकी भरण्यासाठी अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर जेनिफरने असंही सांगितलं की, तिचा पगार थांबवल्याबद्दल निर्मात्यांना फीदेखील भरावी लागेल, सुमारे  25-30 लाख रुपये अभिनेत्रीला त्यांना द्यावे लागतील. इतकंच नाही तर असित कुमार यांना  5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

फैसल आणि शोचे निर्मात्यांच्या विरोधात शारिरीक शोषण प्रकरणात बोलताना जेनिफर मिस्त्री बंसीवालने खुलासा केला आहे की, हा निर्णय जाहिर होवून बरेच दिवस झाले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 ला हा निर्णय जाहीर झाला मात्र अभिनेत्रीला या संदर्भात कोणाला काही न सांगण्याचे आदेश मिळाले होते.