'मी काही हातातलं लहान खेळणं नाही', भुजबळ संतापले; रोख अजित पवारांकडे?

Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याचे समोर आले आहे. लवकरच ते मोठा निर्णय घेण्याची तयारीत असल्याचे चर्चा आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 17, 2024, 12:22 PM IST
'मी काही हातातलं लहान खेळणं नाही', भुजबळ संतापले; रोख अजित पवारांकडे?
NCP leader Chhagan Bhujbal Says Rejected Rajya Sabha seat give ultimate to ncp

Chhagan Bhujbal: मंत्रिपद कोणी नाकारलं ते असलं तरी पक्षाचे जे प्रमुख आहेत ते निर्णय घेतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली तो आहे. त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखी काही सांगेन, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसंच, मी तुमच्या हातातील काही लहान खेळणं आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

छगन भुजबळ यांनी पुढे म्हटलं आहे की, 'लोकसभेत उभे राहा म्हणून त्यांनीच सांगितलं होतं. मोदी साहेबांनी आणि अमित शहांनी सांगितलं की लोकसभेत उभे राहा. सगळी तयारी झाली चांगलं वातावरण निर्माण झाले. आम्ही प्रयत्न सुरू केले. तुम्हालाच उभं राहचंय असं सांगून ही एक महिना झालं तरी नाव जाहीर झालं नाही. मग आम्ही माघार घेतली,' असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 

'मला जे काही कळलं ते मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा असा आग्रह धरला होता. हे मी कन्फर्म करुन घेतलं आहे. लोकसभेत मी जातो म्हणालो ऐनवेळी तुम्ही कच खाल्ली. नाव जाहीर केलं नाही. राज्यसभेला नाव देण्याची वेळ आली तेव्हा सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर झाले. दुसरं नाव मकरंद पाटील यांचे बंधु नितीन पाटील यांचं नाव दिले. मी म्हटलं मला जाऊद्या माझा पक्षाला फायदा होईस तेव्हा म्हटलं मी शब्द दिला होता. आणि तुम्ही महाराष्ट्रात असणं पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे. आम्ही लढलो आणि आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा, असंही भुजबळांनी म्हटलं आहे.

'मी आत्ताच निवडणूक लढलो आहे. मला विजयी करण्यासाठी माझ्या लोकांनी जीव काढला. मी त्यांना काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जाण्यासाठी विधानसभेचा राजीनामा द्यावा लागतो. मला एक दोन वर्ष द्या मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन मी राज्यसभेवर जाईन. त्यानंतर ते म्हणाले चर्चा करु आणि बसू पण ते बसलेच नाही,' अशी खंतही भुजबळांनी व्यक्त केली.

'मी चार सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं मला राज्यसभेवर जायचं होतं. मी काही हातातलं लहान खेळणं आहे का. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वर जा, खाली बसा आता निवडणूक लढा असं सांगायला. मी राजीनामा दिल्यावर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल. तुम्ही म्हणणार बस बस, उठ उठ छगन भुजबळ असा मनुष्य नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x