असं कुणी करतं का? बबिताचं फोटोशूट सुरु असताना घडला 'हा' प्रकार

बबिता जी रील लाइफपासून ते खऱ्या आयुष्यापरर्यंत लोकांची मने जिंकण्यासाठी ओळखली जाते.

Updated: Mar 26, 2022, 03:55 PM IST
असं कुणी करतं का? बबिताचं फोटोशूट सुरु असताना घडला 'हा' प्रकार  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ची बबिता जी रील लाइफपासून ते खऱ्या आयुष्यापरर्यंत लोकांची मने जिंकण्यासाठी ओळखली जाते. शोबद्दल बोलायचं झालं तर, ती गोकुलधाम सोसायटीची सगळ्यात सुंदर महिला आहे. मात्र खऱ्या आयुष्यातही  तिला हेडलाइनमध्ये कसं रहायचं हे चांगलच माहिती आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या सौंदर्याने, स्टाईलने आणि आत्मविश्वासाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. याचा पुरावा म्हणजे तिने नुकताच शेअर केलेला फोटो. आज आम्‍ही तुम्‍हाला दाखवणार आहोत की, तिला खऱ्या आयुष्यात लोकं  पाहून  कसे मंत्रमुग्ध होतात.

अभिनेत्रीला पाहून या व्यक्तीला बसला धक्का
अभिनेत्री मुनमुन दत्ताने शुक्रवारी तिच्या ट्रॅव्हल डायरीतील काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती  विविध भागात फिरताना ती दिसत आहे. मात्र, एका फोटोत दोन लोकं तिच्याकडे टक लावून पाहत आहेत. सुंदर बबिताला पाहून हे लोक मंत्रमुग्ध झाले होते. फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं की, 'या दोन व्यक्तींचे हावभाव आजही माझे फेवरेट आहेत.'

जेठालालला देतायेत टक्कर 
हा फोटो पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येईल हे मात्र नक्की. तारक मेहता का उल्टा चष्मामधील  सुंदर अभिनेत्री मुनमुन दत्ता उर्फ ​​बबिता जीला पाहून त्यातील एक माणूस  डोळा मारत आहे असं दिसतं. खर्‍या अर्थाने ही दोन्ही मंडळी जेठालालला तगडी टक्कर देत आहेत.