टप्पूसोबतच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान 'जेठालाल'चा व्हिडिओ व्हायरल

गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Updated: Dec 1, 2021, 08:01 PM IST
टप्पूसोबतच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान 'जेठालाल'चा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमध्ये कॉमेडी, इमोशन लव्ह आणि कौटुंबिक काळजी या सगळ्या गोष्टी एकत्र पाहायला मिळतात. या शोमधील पात्रांना त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी चांगलीच पसंती मिळाली आहे. त्याचबरोबर, शोमधील बहुतेक प्रेक्षकांना 'जेठालाल' आणि 'बबिता जी' ही पात्रदेखील खूप आवडतात.

शोमध्ये 'बबिता जी' म्हणजेच मुनमुन दत्ता केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. त्याचवेळी शोमध्ये 'बबिता'ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजेच अभिनेता राज अनडकट यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो 'बबिता जी'ला डेटवर घेऊन जाण्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना दिसत आहे. 

'जेठालाल' म्हणजेच दिलीप जोशी यांच्या फॅन पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका कार्यक्रमात दिसत असल्याचं तुम्ही पाहू शकता. यादरम्यान दिलीप जोशी यांना विचारण्यात आलं की, 'बबिता जी यांना डेट करण्याची संधी मिळाली तर या संधीचा फायदा घेणार का?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रश्नावर दिलीप जोशी यांनी दिलेल्या उत्तरानं चाहत्यांची मनं जिंकली. दिलीप जोशींनी उत्तर दिलं होतं, 'मला जेठालालबद्दल माहिती नाही, पण दिलीप जोशी म्हणून मला डेट करायला आवडणार नाही असं मला म्हणायचं आहे. मी एक विवाहित आणि आनंदी विवाहित व्यक्ती आहे त्यामुळे मला त्याची गरज नाही. जेठालालच्या या गोष्टीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.