शमिता शेट्टी राकेश बापटवर सगळ्यांसमोर भडकली म्हणाली, 'नाव खराब करुन ठेवलय'

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची जोडी बिग बॉस ओटीटी पासून बरीच चर्चेत आहे. 

Updated: Sep 27, 2021, 09:26 PM IST
शमिता शेट्टी राकेश बापटवर सगळ्यांसमोर भडकली म्हणाली, 'नाव खराब करुन ठेवलय'

मुंबई : शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची जोडी बिग बॉस ओटीटी पासून बरीच चर्चेत आहे. एका सोशल मीडिया युजर्सने शमिता शेट्टीला विचारलं की, राकेश बापटची त्रासदायक गोष्ट काय आहे? यावर शमिता शेट्टीने मजेदार उत्तर दिलं.

राकेश बापटच्या वक्तव्यामुळे शमिता शेट्टी चिडली
एका युजर्सने तिला राकेश बापटची कोणती सवय आवडत नाही असा प्रश्न विचारला.यावंर शमिता शेट्टीने लाईव्ह सेशनमध्ये उत्तर देत गंमतीत म्हणाली की, तिला त्याच्या कोणत्याही सवयी आवडत नाहीत. पण नंतर सांगितलं की राकेश खूप चहा पितो आणि तिला ही गोष्ट आवडत नाही. ती पुढे म्हणाली की, राकेश बापटने चहा पिण्याची सवय थोडी कमी करावी. 

त्याचबरोबर, राकेश बापटने शमिताला वचन दिलं की तो चहा पिणं बंद करेल, यावर शमितानेही लगेच उत्तर दिलं. शमिता म्हणाली की, तिला आलं आणि मसाला चहा कसा बनवायचा हे देखील माहित आहे आणि तिने ते बनवलं आणि राकेशला असा चहा बनवूनही दिला आहे. तिने सांगितलं की, राकेशने तिचं नाव खराब केलं आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये धमाका केल्यानंतर आता शमिता शेट्टीदेखील बिग बॉस 15 मध्ये सहभागी होणार आहे. ती या शोची स्पर्धक असेल पण राकेश बापट या क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकला नाही. पण त्याला घराच्या आत जाण्याची ऑफर आली आहे.