Taarak Mehta मधील सोनूने रिअल लाईफ पार्टनरसाठी स्वत:ला बदललं?

या दरम्यानच निधीचा एक फोटो व्हायरल होत आहे.

Updated: Nov 18, 2021, 05:49 PM IST
Taarak Mehta मधील सोनूने रिअल लाईफ पार्टनरसाठी स्वत:ला बदललं? title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या शो मधील प्रत्येक पात्राचं एक वेगळं फॅन फॉलोविंग आहे, मग या त महत्त्वाच्या पात्रांपासून ते बालकलाकारांचा ही समावेश आहे. त्यात आता एक अशी चाईल्ड आर्टिस्ट आहे जी आता खूप मोठी झाली आहे आणि ग्लॅमरस लूकमुळे ती सतत चर्चेत येत आहे.

तारक मेहता मधील सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या दरम्यानच निधीचा एक फोटो व्हायरल होत आहे.
निधीला या नव्या लूकमध्ये पाहून फॅन्स चकित झाले आहेत. 

निधी भानुशालीने इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती जीममध्ये दिसून येत आहे. जीममध्ये साडी नेसून पोहोचल्याने तिला ट्रोल ही केलं जात आहे.  तिने व्हाईट कलरच्या ब्लाऊजवर प्रिंटेड साडी परिधान केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचवेळी दुसऱ्या फोटोमध्ये तिच्यासोबत एक मुलगा दिसत आहे. ज्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहे.

चाहते सतत या फोटोंवर कमेंट करत आहेत आणि निधीला अनेक प्रश्न विचारत आहेत. निधीला एका युजरने , हा तिचा बॉयफ्रेंड आहे का? असा प्रश्न विचारला आहे.