Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:जेव्हा जेठालालच्या आयुष्यात आली होती आणखी एक स्त्री

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा टीव्ही शो जगातला एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे.

Updated: Jul 2, 2021, 09:30 PM IST
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:जेव्हा जेठालालच्या आयुष्यात आली होती आणखी एक स्त्री

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा टीव्ही शो जगातला एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या शोमध्ये समाजाशी संबंधित मुद्द्यांविषयी मजेदार पद्धतीने चर्चा केली जाते आणि यामुळेच हा शो देखील पसंत केला जातो. शोचे नवीन भाग जितके मजेदार आहेत तितकेच जुने भागदेखील मनोरंजक आहेत. आज आम्ही तुम्हाला या शोच्या जुन्या प्रसंगाबद्दल सांगणार आहोत, जेव्हा दुसरी स्त्री जेठालाल आणि दयाबेन यांच्या नात्यात प्रवेश करते.

जेठाच्या आयुष्यातली दुसरी स्त्री
या शोच्या एका भागामध्ये, मिनी स्कर्ट आणि पिवळ्या रंगाचे शर्ट घातलेली एक सुंदर मुलगी दाखण्यात आली आहे. जी असा दावा करते की, जेठालाल आणि तिच्यात काही संबंध आहेत आणि त्यामुळे घरातल्या माणसांना त्रास होतो. टप्पू देखील त्या मुलीला त्याची आई म्हणून स्वीकारतो आणि बापूजी जेठालाल यांना त्या मुलीला स्विकारण्यास सांगतात. हे ऐकून दयाच्या पायाखालची जमीन सरकते. बापूजी दयाला तिच्या आईकडे म्हणजेच माहेरी निघून जाण्यास सांगतात.

बापूजी आणि टप्पूने सगळ्यांसमोर आणलं सत्य
बापूजी घराची सर्व जबाबदारी त्या मुलीला देतात आणि जेठालालला लग्नाची तयारी करायला सांगतात. पण ती मुलगी लग्न करण्यास नकार देते आणि आपलं सगळं सत्य कुटुंबास सांगते. टप्पू आणि बापूजींनी त्यांच्या हुशारीने आणि शहाणपणामुळे त्या मुलीचं सत्य सर्वांसमोर आणलं.

दुसरी महिला अभिनेत्री
या मालिकेत आजची सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना हिने ही भूमिका साकारली होती. सुरभीने प्रसिद्ध टीव्ही शो 'नागीन' मध्येही काम केलं आहे.