Health Update : नसीरुद्दीन शाह यांना हॉस्पिटलमधून सुट्टी नाही, पण डिस्चार्ज कधी

 बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

Updated: Jul 2, 2021, 08:30 PM IST
Health Update : नसीरुद्दीन शाह यांना हॉस्पिटलमधून सुट्टी नाही, पण डिस्चार्ज कधी

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाहची प्रकृती आजकाल खूप खराब आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिथे आता स्वत: नसीरुद्दीन यांनी फोनवर आपली अवस्था सांगितली आहे. एका वृत्ताशी बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी रविवारी रुग्णालयातून घरी परतणार असल्याचं सांगितलं आहे. नसीरुद्दीन यांच्या घरच्यांनी सांगितलं होतं की, त्यांना आज 2 जुलै रोजी रुग्णालयातून सोडण्यात येईल, परंतु असं दिसतं आहे की, त्यांना आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार आहे.

एका वृत्ताशी फोनवर बोलताना नसीरुद्दीन म्हणाले की, "रविवारपर्यंत मला डिस्चार्ज मिळेल अशी आशा आहे, तुम्ही माझ्या प्रकृतीची विचारपुस केली मला खूप छान वाटलं." ते एक बॉलिवूडचे बिनधास्त स्टार आहेत. ते प्रत्येकाच्या फेवरेटलिस्ट मध्ये आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्यांनी बऱ्याच स्टार्सना मागे टाकलं आहे. त्याच्या तब्येतीची चर्चा प्रेक्षकांमध्येही सुरू आहे. अलीकडे नसीरुद्दीनची पत्नी रत्न पाठक यांनीही अभिनेत्याच्या तब्येतीबद्दल बोलताना सांगितलं की, ते पूर्णपणे ठीक आहेत. त्यांच्या फुफ्फुसावर एक लहान स्पॉट आहे. ज्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आता नसीरुद्दीन यांची तब्येत खूप स्थिर आहे. ज्यामुळे कोणतीही अडचण नाही. नसीरुद्दीन शाह आपलं वैयक्तिक जीवन खूप वेगळं ठेवतात. त्यांना आपल्या आवडीच्या सिनेमात काम करायला आवडतं. यासह, त्यांनी अनेक आर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे. नसीरुद्दीन शाह बऱ्याच शॉर्ट फिल्ममध्येही दिसले आहेत. त्यांना ज्या कथा आवडतात, त्या दिशेने ते वाटचाल करत आहेत. नसीरुद्दीनचे चाहते त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. आशा आहे की ते रविवारी घरी परत येतील.

नसीरुद्दीन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नसीरुद्दीन शाह गेल्या वर्षी 'बंदिश बँडिट्स' या वेब सीरिजमध्ये दिसले होते. या सिरीजमध्ये ते राग दरबारीच्या भूमिकेत दिसले होते. ही सिरीज प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.