तीन वेगळ्या भाषांमध्ये झळकणार सिनेमा '83'

'83' सिनेमाच्या माध्यमातून उलघडणार विश्वचषक 1983चा इतिहास 

Updated: Jan 23, 2019, 11:57 AM IST
तीन वेगळ्या भाषांमध्ये झळकणार सिनेमा '83'

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या नावाची चर्चा फार रंगत आहेत. एकापाठोपाठ एक धमाकेदार सिनेमे घेवून तो चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'सिन्बा' सिनेमाच्या यशानंतर त्याचा 'गली बॉय' सिनेमा चाहत्याचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन सिनेमांनंतर रणवीर '83' सिनेमामध्ये दिसणार आहे. '83' सिनेमामध्ये महान क्रिकेटर कपिल देव यांची यशोगाथा रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 1983 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भरताने दमदार कामगिरी बजावत विश्वचषक भरताच्या नावी केले. 

भारतात क्रिकेटला एक अग्रगण्य स्थान आहे. 1983 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्यादांच आपल्या विजयाचा झेंडा रोवला. '83' सिनेमा हिंदी त्याचबरोबर अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमा हिंदि, तमीळ आणि तेलगु अशा तिन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक कबीर खान सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. रणवीरने सिनेमाचे शूटिंग सुरु केले. कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारण्यसाठी तो कपिल देव यांच्याकडून विशेष प्रशिक्षण घेत आहे.