प्रेम असंच असतं... 10 वर्षे प्रसिद्ध अभिनेत्याला डेट केल्यानंतर तब्बू आजही त्याच्या आठवणीत एकटीच...

'अधुरी एक कहाणी...', 'त्या' अभिनेत्याच्या आठवणीत एकटी आयुष्य जगतेय तब्बू, पण त्याच्यासाठी आजही...  

Updated: Aug 8, 2022, 10:59 AM IST
प्रेम असंच असतं... 10 वर्षे प्रसिद्ध अभिनेत्याला डेट केल्यानंतर तब्बू आजही त्याच्या आठवणीत एकटीच... title=

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेच्यापेक्षा कमी नसतं. काही सेलिब्रिटींच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, पण शेवट मात्र ब्रेकअपने झाला. त्यामुळे सेलिब्रिटींमध्ये प्रेमाची व्याख्या नक्की काय असते? हे सांगणं कठीण आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार सर्वकाही असून आज एकटं आयुष्य जगतात, त्यामधील एक म्हणजे तब्बू. एक काळ होता जेव्हा तब्बूने फक्त प्रेक्षकांना नाही तर, अभिनेत्यांपण घायाळ केलं. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता अक्किनेनी नागार्जुन. 

तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुनसोबत  जवळपास 10 वर्ष रिलेशनमध्ये होते. पण तब्बल 10 वर्षांनंतर हे नात तुटलं आणि दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. लग्न झालं नसलं तरी तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुनसोबत  यांच्यात आजही मैत्रीचं नातं जिवंत आहे. 

जेव्ही अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू रिलेशनमध्ये होते तेव्हा  दोघांच्या भेटीच्या आणि प्रेमाच्या चर्चा सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. या नात्याविषयी तब्बूने अनेक वर्षांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये मोठा खुलासा केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2007 साली जेव्हा करणने तब्बूला  नागार्जुनसोबत असलेल्या नात्याबद्दल विचारलं तेव्हा तिने उघडपणे सर्व गोष्टी सांगितल्या. तब्बू म्हणाली होती, 'बॉयफ्रेंड येत जात राहतात, पण नागार्जुन कायम राहिल. मला नाही माहिती याठिकाणी काय सांगायलं हवं.. पण तो माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींपैकी एक आहे.'

ती पुढे म्हणाली, 'जगातील कोणतचं नातं आम्हाला दूर करू शकत नाही... माझ्याकडे आमच्या नात्यासाठी कोणताही लेबल नाही... यासाठी मी काही करू शकत नाही...' असं म्हणत तब्बू याठिकाणी मैत्रीचं महत्त्व पटवून दिलं. 

एवढंच नाही तर नागार्जुनने देखील तब्बूसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं. 'तब्बू 16 आणि मी 22 वर्षांचा होतो तेव्हा आमची ओळख झाली. आम्ही चांगले मित्र आहोत. माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही...' असं  नागार्जुन म्हणाला होता.