तैमूरच्या पब्लिसिटीवर काय म्हणाली आजी शर्मिला टागोर?

लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर काय म्हणाली? 

तैमूरच्या पब्लिसिटीवर काय म्हणाली आजी शर्मिला टागोर?

मुंबई : सैफ अली खान आणि करिना कपूर खानचा मुलगा तैमूर आपल्या क्यूटनेसमुळे कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर दोन दिवस आड करून तैमूरचीच चर्चा असते. तैमूरच्या शाळेतल्या व्हिडिओपासून ते त्याच्या जिम जाण्याच्या व्हिडिओपर्यंत सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच काय तर तैमूर सेलिब्रिटींचा देखील आवडता आहे. एवढंच काय तर एकेकाळी आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री शर्मिला टागोर म्हणजे तैमूरची आजी देखील या क्यूट तैमूरची फॅन आहे.  

काय म्हणाली आजी शर्मिला 

एका कार्यक्रमात शर्मिला टागोर असं म्हणाली, तिचा नातू तैमूर अली खान तिच्यापेक्षाही लोकप्रिय आहे. लोकप्रिय झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. पश्चिम बंगाल सरकार आणि कोलकाता पोलिसद्वारे आयोजित कार्यक्रमात ती पोहोचली होती. तेव्हा मीडियाने तैमूर बद्दल विचारलं. तेव्हा शर्मिला टागोर म्हणाली की, तैमूर आपल्या क्यूटनेसमुळे आणि नटखट लिलांमुळे स्टार बनला आहे. शाळेत जाण्याअगोदर तैमूर आपल्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसतो.

आपल्याला माहितच आहे काही दिवसांपूर्वी, तैमूरच्या लोकप्रियतेमुळे करिना - सैफ चिंतेत होते. तैमूर अजून लहान आहे त्याला याबाबत काही कळत नाही. पण सार्वजनिक ठिकाणी त्याला हाक मारल्यावर तो प्रतिसाद देतो. मीडियाशी देखील तो खूप सहज वावरतो.