आताच्या आता थांब नाहीतर....; अभिनेत्रीला क्रूर तालिबानकडून धमकी

तालिबानचा क्रूर चेहरा जगासमोर आणणं तिला पडलं महागात.....   

Updated: Aug 19, 2021, 04:20 PM IST
आताच्या आता थांब नाहीतर....; अभिनेत्रीला क्रूर तालिबानकडून धमकी title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

काबूल : (Kabul) काही दिवसांपूर्वी (Afghanistan) अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज सुरु झालं. तालिबाननं अगाणिस्तानवर कब्जा मिलवताच इथल्या नागरिकांमध्ये कमालीचं दहशतीचं वातावरण पाहायला मिळालं. या राष्ट्रातील नागरिकांप्रती जगभरातून सहानुभूतीची भावना व्यक्त करण्यात आली.

अफगाणिस्तानातील लोकांना अशा अवस्थेत पाहून अफगाणी मूळ असणाऱ्या अभिनेत्री Azita Ghanizada हिनं मागील काही दिवासंपासून सोशल मीडियावर तालिबानविरुद्ध (Taliban) काही पोस्ट करत त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी काही पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. 

अफगाणिस्तानमध्ये काही गोष्टी तालिबानचं शासन येताच कशा झपाट्यानं बदलल्या याकडे ही अभिनेत्री लक्ष वेधत आहे. तिनं अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्याकडेही अफगाणिस्तानसाठी मदतीची मागणी केली आहे. 

आपल्या परिनं अफगाणी नागरिकांची मदत करु पाहणाऱ्या या अभिनेत्रीला तालिबानकडून धमकीवजा मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. खुद्द Azita Ghanizada हिनंच याबाबतचा खुलासा केला आहे. तालिबानविरोधी चिथावणीखोर पोस्ट करणं बंद करण्यास तिला या मेसेजमधून सांगण्यात येत आहे. 

कोण आहे Azita Ghanizada ? 
Azita Ghanizada ही एक अभिनेत्री असून, तिचा जन्म अफगाणिस्तानातील काबुल येथे झाला होता. तिचे वडील तेहरान येथील युएस दुतावासात कार्यरत होते, तिथूनच त्यांना अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. अमेरिका आणि भारतीय कलाकारांवर असणाऱ्या प्रेमामुळंच Azita Ghanizada लाही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली.