नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटात 'या' अभिनेत्रीची वर्णी

'बोल चूडिया' चित्रपटातून मौनी रॉयला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे

Updated: Jun 28, 2019, 08:52 PM IST
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटात 'या' अभिनेत्रीची वर्णी

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी 'बोल चूडिया' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'बोल चूडिया' चित्रपटात नवाजुद्दीनसह अभिनेत्री मौनी रॉय स्क्रिन शेअर करणार होती. मात्र चित्रपटातून मौनी रॉयला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर आता चित्रपटात नव्या अभिनेत्रीला, प्रमुख भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं आहे. मौनीच्या जागी बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या भाऊ 'बोल चूडिया' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर 'चित्रपटासाठी योग्य अभिनेत्रीचा शोध अखेर संपला. 'बोल चूडिया' कुटुंबात तमन्नाचं स्वागत' असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.

तम्मनानेही चित्रपटाचं कथानक अतिशय रंजक असून, या चित्रपटाचा भाग असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

साऊथ अभिनेत्री तमन्नाने बॉलिवूडमध्ये 'बाहुबली', 'हिम्मतवाला', 'हमशक्ल' आणि 'एन्टरटेन्मेंट'यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.