तामिळ अभिनेत्याने आपल्याच नातेवाईकाशी केलं तिसरं लग्न, म्हणतो 'ती लहान असल्यापासून...'

तामिळ अभिनेता बालाने आपल्याच नात्यातील कोकिलाशी लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मंदिरात खासगी पद्दतीने दोघे विवाहबंधनात अडकले.   

शिवराज यादव | Updated: Oct 23, 2024, 04:49 PM IST
तामिळ अभिनेत्याने आपल्याच नातेवाईकाशी केलं तिसरं लग्न, म्हणतो 'ती लहान असल्यापासून...'

तामिळ अभिनेता बाला (Tamil Actor Bala) आपल्या नववधूसह कलूर पावकुलम मंदिरात (Kaloor Pavakulam Temple) पोहोचला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तामिळ स्टाने आपल्या नात्यातील मुलीशीच लग्न केलं आहे. बालाने चेन्नईत वास्तव्यास असणाऱ्या कोकिलासह एका मंदिरात लग्न केलं. खासगी सोहळ्यात हा विवाहसोहळा पार पडला. मोजके नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत दोघे विवाहबंधनात अडकले. 

Add Zee News as a Preferred Source

लग्नानंतर त्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बालाने आपली पत्नी मामाची मुलगी असल्याचं सांगितलं. तिच्या लग्न केल्याने आपलं एक जुनं स्वप्न पूर्ण झाल्याचं त्याने सांगितलं. बालाने यावेळी आपल्या पत्नीचे आभार मानले. ती आपला मोठा पाठिंबा असून, रिकव्हर होण्यात आणि आरोग्य सुधारण्यात मदत केल्याची माहिती त्याने दिली. 

यावेळी बालाने आपल्या लग्नाची वेळ आणि सध्या सुरु असलेल्या वादांवरही भाष्य केलं. आपल्याला जर कोणी आशीर्वाद देत असेल तर आम्ही दोघे तो स्विकारण्यास तयार असल्याचं सांगितलं. बाला म्हणाला की, "कोकिला माझी नातेवाईक आहे. हा क्षण साजरा करण्यासाठी आज माझी आई येथे असायला हवी होती. ती 74 वर्षांची असून तिची प्रकृती फार नाजूक आहे. तिची लग्नाला हजेरी लावण्याची फार इच्छा होती. यानिमित्ताने कोकिलाने कित्येक वर्षं पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. आम्हाला जे कोणी आशीर्वीद देऊ इच्छित आहेत, त्यांचा आम्ही स्विकार करु. कोकिला मल्याळम बोलत नाही, पण तिने मला फार पाठिंबा दिला आहे. तिच्यामुळे गेल्या वर्षभरात माझ्या प्रकृतीत फार सुधारणा झाली".

बाला आणि कोकिला यांच्या लग्नाचे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत. बालाचे यापूर्वी दोनदा लग्न झालं आहे. 2010 मध्ये त्याचं पहिलं लग्न गायिका अमृता सुरेशसोबत झालं. त्यांना अवंतिका नावाची मुलगी आहे. 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर 2021 मध्ये एलिजाबेथशी त्याने दुसरं लग्न केलं. पण 2023 पासून ते विभक्त राहत आहेत. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More