धक्कादायक... प्रसिद्ध अभिनेत्रीने मागवलेल्या ऑनलाईन जेवणात आढळले दोन झुरळ

तुम्ही ऑनलाईन जेवण मागवत असाल तर सावधान...

Updated: Jun 25, 2021, 06:28 PM IST
धक्कादायक... प्रसिद्ध अभिनेत्रीने मागवलेल्या ऑनलाईन जेवणात आढळले दोन झुरळ title=

मुंबई :  कामाचा वाढता ताण आणि व्यस्त वेळापत्रक... यामुळे अनेक जण जेवण ऑर्डर करतात. पण स्विगीवरून मागवलेल्या पार्सलमध्ये तामिळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दोन झुरळ आढळले. अभिनेत्री निवेथा पेठूराजने स्विगीवरून जेवण ऑर्डर केलं होतं. जेव्हा तिने पार्सल ओपन केलं तेव्हा तिला पार्सलमध्ये दोन मृत  झुरळ दिसले. त्यानंतर निवेथाने तात्काळ सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले. फोटो शेअर तिने कॅप्शमध्ये 'मला माहिती नाही स्विगी इंडिया आणि निगडीत रेस्टॉरंटचा काय दर्जा आहे...'

निवेथा पुढे म्हणाली, 'माझ्या जेवणात मला दोनवेळा झुरळ आढळले आहेत. अशा रेस्टॉरंटवर कडक कारवाई व्हायला हवी. शिवाय अशा रेस्टोरेंट्सवर दंड देखील आकारायला हवा. ' सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्ट व्हायरल होताचं स्विगी माफी देखील मागितली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निवेथाच्या तक्रारीनंतर स्विगीने माफी मागितली आहे. कंपनीने मेलमध्ये लिहिलं आहे की, 'तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळे आम्ही आभारी आहोत. आम्ही तुमच्या संयमाची काळजी घेऊ. आमची टीम मार्वल यावर कारवाई करेल. काळजी करू नका, ही तक्रार रेस्टॉरंटमध्ये पाठविली गेली आहे.'