मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी VIP, VVIP दर्शन पास बंद होणार?

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी VIP, VVIP दर्शन पास बंद करावा अशी मागणी मनसेनेकेली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 22, 2024, 05:41 PM IST
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी VIP, VVIP दर्शन पास बंद होणार? title=

Mumbai Shri Siddhivinayak Temple VIP Darshan : सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी VIP दर्शन पास बंद करण्यात आला आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होते. सिद्धीविनायक मंदीरात सर्वांना समान दर्शन द्यावे अशी मागणी मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. 

मंदिरात VIP आणि VVIP दर्शनाच्या पासमुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ लागत होता. मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मंदिर प्रशासनाने  गेल्यावर्षी मंदीरात VIP आणि VVIP दर्शन बंद केले होते. यावर्षी पुन्हा VIP,VVIP पास सुरू करण्याचा विचार मंदिर प्रशासनाने केला असल्याची माहिती किल्लेदार याना मिळाली.  त्यांनी याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाने VIP दर्शन बंद असल्याचे त्यांना सांगितले. 

7 जुलैपासून भाविकांना पांडुरंगाचं 24 तास दर्शन

पंढरपुरात आषाढ वारी नियोजनाची बैठक पार पडली.. या बैठकीत 17 जुलै रोजी आषाढ वारी सोहळा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.. 7 जुलैपासून भाविकांना पांडुरंगाचं 24 तास दर्शन घेता येणार आहे.. या बैठकीत मानाच्या दहा पालखी प्रमुकांच्या शासकीय पूजेत बसवण्याबाबत चर्चा झाली नाही.. त्यामुळे पालखी प्रमुखांना शासकीय महापूजेत बसवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

आषाढी एकादशी शासकीय महापूजा करताना मुख्यमंत्री यांच्या सोबत मानाचा दहा पालखी प्रमुखांना पास देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायाची बैठक घेतली होती त्यावेळी त्यांच्याकडे मानाच्या दहा पालखी प्रमुखांनी शासकीय महापूजा पास देण्याची मागणी केली होती. यावरून मत मतांतरे सुरू झाली. आज मंदिर समितीची बैठक झाली या बैठकीनंतर सह अध्यक्ष औसेकर यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. पास देण्याचा असा कोणताही निर्णय झाला नाही. याबाबत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा करते वेळी कोणी उपस्थित राहायचे याचा निर्णय घेतील असे स्पष्ट केले