छगन भुजबळ यांची चर्चा यशस्वी ; OBC नेत्याने 10 दिवसांचे उपोषण एका तासात संपवल

उपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून आले असले तरी भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसींच्या बाजूनं मतं मांडली. तसंच आलेल्या धमक्यांना त्यांनी शायरीतून उत्तर दिलं. तसंच त्यांनी विरोधकांनाही इशारा दिला. 

वनिता कांबळे | Updated: Jun 22, 2024, 04:45 PM IST
छगन भुजबळ यांची चर्चा यशस्वी ; OBC नेत्याने 10 दिवसांचे उपोषण एका तासात संपवल title=

Chhagan Bhujbal At OBC Laxman Hake Protest :  सरकारच्या पत्रानंतर OBC नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतले आहे. मात्र, आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. उर्वरित मागण्यांबाबत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय होणार आहे.  लक्ष्मण हाके यांची समजुत काढण्यात सरकार यशस्वी ठरले आहे ते मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे.  छगन भुजबळ यांची खेळी यशस्वी ठरली आहे. छगन भुजबळ यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषनस्थळी जाऊन हाके यांच्याशी चर्चा केली. चर्चा यय़स्वी ठरली असून लक्ष्मण हाके यांनी 10 दिवसांचे उपोषण एका तासात मागे घेतले आहे. 

वडीगोद्रीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आंदोलन अखेर मागे 

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्रीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय.. सरकारच्या आश्वासनानंतर तूर्तास उपोषण स्थगित करण्याचा निर्णय प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी घेतला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही सरकारी शिष्टमंडळानं उपोषणकर्त्यांना दिली. ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, उर्वरित मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं छगन भुजबळांनी दिलं. त्यानंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा हाके आणि वाघमारेंनी केली. दरम्यान, उपोषण मागे घेतलं असलं तरी लढा सुरूच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय..

मंत्री छगन भुजबळ यांची शेरोशायरी

सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या भेटीला वडीगोद्रीला पोहोचले. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करत नाव न घेता जरांगेपाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.. कुणी स्वतःला महाशक्ती समजत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की लोकशक्ती सर्वात मोठी आहे.. असा इशाराही छगन भुजबळ यांनी दिलाय.  

सरकारच्या शिष्टमंडळानं वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंशी चर्चा केली. ओबीसी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.. त्याची माहिती लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलकांना देण्यात आली.  या शिष्टमंडळात छगन भुजबळ, महाजन, सावे, सामंत, मुंडे, भुमरे आहेत.