चेन्नई : सिनेसृष्टीतली मंडळी आता राजकारणाकडे वळताना दिसत आहेत. शनिवारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नमिताने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थित ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. त्याआधी अभिनेते राधा रवी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपचे जेपी नड्डा यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. आता येत्या दिवसांत किती कलाकार भाजपमध्ये प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लग्नानंतर नमिताने एआयएडीएमकेची सदस्यता घेतली होती. पक्षाच्या स्टार प्रवक्त्यांच्या यादीत तिचे नाव होतं. पण आता तिने पतीसोबत भाजपमध्ये प्रवेश केला आणि एआयएडीएमकेसोबत असलेलं नातं तोडलं आहे.
Tamil Nadu: Actress Namitha joins BJP, in presence of BJP National Working President JP Nadda. pic.twitter.com/nqPF6cuEJO
— ANI (@ANI) November 30, 2019
दक्षिण भारतातील राज्यात भाजप आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. त्यामुळे तमिळनाडूत पोहोचलेल्या जेपी नड्डा यांच्या उपस्थित अभिनेत्री नमिता सोबतच अभिनेता राधा रवी यांची भाजप पक्षात प्रवेश केला. तमिळ बिग बॉसच्या माध्यमातून नमिता छोट्या पडद्यावर झळकली होती.
त्यानंतर तिने झगमगत्या दुनियेला रामराम ठोकला. अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्याआधी तिने १९९८ साली सुरतच्या ताजवर आपलं नाव कोरलं होत. त्याचप्रमाणे तिने 'फेमिना मिस इंडिया २००१' मध्ये देखील सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये ती तिसरी रनर अप होती.
शिवाय, 'सोनी व्यूअर्स चॉइस मिस इंडिया २००१' चा किताब देखील तिच्या नावावर आहे. २००२ साली प्रदर्शित झालेल्या 'सोंथम' चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पाय ठेवला. मात्र आता तिने राजकारणाकडे आपली मोर्चा वळवला आहे.