Tanushree Dutta Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) ही गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कधी तनुश्री ही #metoo कॅम्पेनमुळे तर कधी कोर्ट केसमुळे चर्चेत असते. तनुश्रीचा आज 19 मार्च रोजी तिचा 39 वा वाढदिवस आहे. तनुश्रीनं तिच्या आयुष्यात सगळं काही कमावलं. मात्र, एकवेळ अशी आली जेव्हा तिचं आयुष्य हे 360 डिग्री रोटेट झालं. आज तनुश्रीच्या वाढदिवसानिमित्तानं आपण तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
तनुश्रीचा जन्म 19 मार्च 1984 साली एका बंगाली कुटुंबात झाला होता. तनुश्रीनं तिचं शालेय शिक्षण हे जमशेदपुर येथे केलं आणि त्यानंतर ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला शिफ्ट झाली. कॉलेजमध्ये असताना तनुश्री मॉडेलिंग करू लागली. 2004 साली तनुश्रीनं मिस इंडियाचा खिताब जिंकला होता. तनुश्रीनं त्याच वर्षी मिस वर्ल्डमध्ये तिनं भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मग तनुश्रीनं 2005 साली प्रदर्शित झालेल्या इमरान हाश्मीच्या ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात काम केलं. तनुश्रीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि मग 2010 साली तनुश्रीनं बॉलिवूड चित्रपटाला रामराम केला. त्यानंतर तनुश्रीनं अध्यात्मचा मार्ग निवडला. (Tanushree Dutta Unknown Facts)
तनुश्रीला खूप यश मिळालं मात्र, त्यानंतर अचानक ती डिप्रेशनचा शिकार झाली. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी तनुश्रीनं अध्यात्मचा मार्ग निवडला आणि चित्रपटसृष्टीला राम-राम केला. इतकंच काय तर तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्या विरोधात Me Too चा आरोप केला होता. नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे तनुश्रीनं सांगितलं होतं.
हेही वाचा : Mahesh Manjrekar यांच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठा अपघात!
2012 मध्ये तनुश्री एका कार्यक्रमात पोहोचली होती. त्यावेळी तिला बॉब कट हेअर स्टाईल आणि साडीत पाहून सगळ्यांना धक्काबसला होता. त्यानंतर तनुश्री अचानक गायब झाली. त्यानंतर तनुश्री 2018 साली पुन्हा एकदा अचानक चर्चेत आली होती. त्यावेळी नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीनं मीटूचा आरोप केला होता. तिनं सांगितलं की नाना पाटेकर यांच्या विरोधात बोलल्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.