ते खोटे आहेत...; डिंपल कपाडियांचे उदाहरण देत तनुश्रीचा नानांवर पुन्हा वार, म्हणाली...

Tanushree Dutta: नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिच्या आरोपांवर उत्तर दिलं होतं. त्यावर आता तिने पुन्हा एकदा नानांवर पलटवार केला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 25, 2024, 04:00 PM IST
ते खोटे आहेत...; डिंपल कपाडियांचे उदाहरण देत तनुश्रीचा नानांवर पुन्हा वार, म्हणाली...  title=
Tanushree dutta lashes out on nana patekar sexual harassment denial statement

Tanushree Dutta: नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादावर अलीकडेच नाना पाटेकरांनी मौन सोडलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, तनुश्रीने केलेल्या आरोपांचा काहीच फरक पडत नाही. आता नाना पाटेकरांच्या या वक्तव्यावर तनुश्री दत्ताने पलटवार केला आहे. नानांवर पुन्हा एकदा तिने आरोप केले आहेत. तसंच, ते खोटं बोलताहेत, असा दावाही तिने केला आहे. 

टाइम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे. तिने म्हटलं आहे की, जेव्हा वाराणसीत एका मुलाला त्यांनी कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तेव्हापासून नाना किती खोटं बोलतात हे आता संपूर्ण जगाला कळलं आहे. ते तेव्हा अनिल शर्माच्या चित्रपटासाठी चित्रीकरण करत होते. नानाने पहिले त्या मुलाला कानशिलात लगावली होती. मात्र, नंतर तो चित्रपटाचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पब्लिकने कानउघडणी केली तेव्हा ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जेव्हा यू-टर्न घेण्यात आला तेव्हा त्यांनी माफी मागितली, असं तनुश्री दत्ता हिने म्हटलं आहे. 

तनुश्रीने पुढं म्हटलं आहे की, आता नाना घाबरले आहेत. इंडस्ट्रीमध्ये त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा बेस हादरला आहे. जे पण त्यांना सपोर्ट करत आहेत ते बँकरप्ट झाले आहेत किंवा मग त्यांना नानांनी साइडलाइन केले आहे. लोकांना आता कळेल नाना कसं लोकांचे मन बदलवतात व त्यांच्यामध्ये आग लावण्याची कामं करतात. ते खोटं बोलण्यात तरबेज आहेत. 

तनुश्री दत्ता हिने डिंपल कपाडिया आणि वाराणसीतील त्या मुलांचे उदाहरण देत म्हटलं आहे की, सगळे तर खोटं बोलू शकत नाहीयेत. ठिक आहे एकवेळ मी बोलत असेन. पण डिंपल कपाडिया यांनीही म्हटलं होतं ते चांगले माणूस नाहीयेत. त्या वारणसी बॉयनेही म्हटलं होतं त्यांनी खरंच कानशिलात लगावली होती. जर ते कानशिलात लगावत असतील किंवा दिग्दर्शकाला मारत असतील तर ते एखाद्या महिलेसोबत गैरव्यवहार करणे काही मोठी गोष्ट नाहीये, असं तिने तनुश्रीने म्हटलं आहे. 

लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी कित्येक वर्षांनंतर तनुश्रीच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. मला माहिती होतं असं काहीच झालं नाहीये. मला रागदेखील आला नाही. मला यामुळं काहीच फरक पडत नाही. काही झालं असतं तर मी त्यावर भाष्य केलं असतं. अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं तुम्ही असं केलं? मी काय म्हणणार मी नाही केलं? त्या व्यतिरिक्त काय म्हणू शकलो असतो, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. 

2018 साली नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तिने आरोप केले होते की, चित्रपट हॉर्न ओके प्लीजमध्ये एका गाण्याच्या शुटिंगदरम्यान नानाने आपत्तीजनक व्यवहार केले होते.