मादक सौंदर्याने घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीच्या लेहंग्याने पेट घेतला अन्....

ऐन दिवाळीत घडली घटना 

Updated: Oct 30, 2019, 10:47 AM IST
मादक सौंदर्याने घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीच्या लेहंग्याने पेट घेतला अन्....
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : दिवाळीच्या निमित्तान सेलिब्रिटी वर्तुळात बऱ्याच दिमाखदार अशा समारंभांचं, पार्टीचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका पार्टीला अभिनेत्री निया शर्मा हिनेही हजेरी लावली होती. आपल्या मादक सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करणाऱ्या नियाने यावेळी चंदेरी रंगाचा लेहंगा घातला होता. ज्यामध्ये तिचं रुप आणखी खुलून आलं होतं. तिने सोशल मीडियावरही या लूकचे काही फोटो पोस्ट केले होते. मुख्य म्हणजे नियाच्या याच लेहंग्यामुळे ती आगीच्या झळांपासून बचावली आहे. 

दिवाळी पार्टीदरम्यान एका दिव्यामुळे तिच्या लेहंग्याने पेट घेतला. पण, लेहंग्यामध्ये कापडाचे थर असल्यामुळे आगीचा आणि तिच्या त्वचेचा थेट संपर्क आला नाही. खुद्द नियानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली. तिने लेहंग्याचा जळलेल्या भागाचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'ही त्या एका दिव्याची ताकद आहे. एका क्षणात कापडाने पेट घेतला. मी कपड्यामध्ये असणाऱ्या या थरांमुळे वाचली असावी किंवा मग, एखाद्या अदृश्य शक्तीने माझं रक्षण केलं असावं.'

 
 
 
 

A post shared by Nedrick Entertainment (@nedrickentertainment) on

नियासोबत झालेल्या या अपघाताविषयी कळताच सोशल मीडियावर चाहत्यांनी लगेचच तिची विचारपूर करत काळजी व्यक्त करण्य़ास सुरुवात केली. बऱ्याच मालिकांमधून झळकलेल्या नियाने  या दिवाळी पार्टीत धमाल केली. त्याचे काही व्हिडिओही व्हायरल झाले. या पार्टीला गुरू रंधावा, मिका सिंग, कपिल शर्मा आणि इतरही सेलिब्रिटींची उपस्थिती होती.