कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंड पाहिलीत का? लाखात देखणं आहे 'ती'चं रूप...

पण तुम्हाला माहितीये का या शोतून कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंडही सहभागी होणार आहे. 

Updated: Aug 28, 2022, 03:41 PM IST
कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंड पाहिलीत का? लाखात देखणं आहे 'ती'चं रूप... title=

The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माच्या (The Kapil Sharma Show) लोकप्रिय शोचा नवा सिझन लवकरच सोनी टीव्हीवर (Sony Tv) येतो आहे. या शोमधून काही कलाकार नवीन रूपात दिसणार आहेत तर काही जुन्याच रूपात प्रेक्षकांसमोर येतील. यावेळी काही नव्या चेहऱ्यांनाही शोमध्ये प्रवेश केला आहे. 

पण तुम्हाला माहितीये का या शोतून कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंडही सहभागी होणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलंत. या शोच्या माध्यमातून अभिनेत्री सृष्टी रोडे (Srushti Rode) कपिल शर्माच्या गर्लफ्रेंडच्या भुमिकेत दिसणार आहे. 

कपिल शर्मा शोच्या या दहाव्या सिझनमध्ये सृष्टीची एन्ट्री झाली आहे. या शोमधून ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर पदार्पण करते आहे. 

'बिग बॉस 12' (Big Boss) नंतर सृष्टी रोडे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 2021 मध्ये सृष्टी रोडे यांच्यावरही शस्त्रक्रिया झाली होती आणि शस्त्रक्रियेनंतर तिला फ्रॅक्चरही झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं सांगितले होते की तिच्या पोटामध्ये इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे ती बेड रेस्टवर होती.  

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये ती कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल आणि सृष्टी यांच्यातील केमिस्ट्रीही चांगली दिसत आहे. या शोमध्ये त्याची एन्ट्री आणि 'द कपिल शर्मा शो'चा विस्तारित परिवार काही खास रंग आणणार आहे.

कोण आहे सृष्टी रोडे? 

सृष्टी रोडे याआधी कलर्स वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या १२व्या सीझनमध्ये दिसली होती. तसे, सृष्टी रोडेने 2007 मध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या टीव्ही शो 'कुछ ऐसा तार' मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. सृष्टी रोडेचे वडील टोनी रोडे हे ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर आहेत आणि तिची आई गृहिणी आहे. सृष्टी रोडे यांना श्वेता रोडे नावाची बहीण देखील आहे. सृष्टी रोडेने 2008 मध्ये 'श्श्श फिर कोई है', 2009 मध्ये 'बैरी पिया' आणि 2010 मध्ये 'इश्क ही' या हॉरर शोमध्ये काम केले होते. याशिवाय सृष्टी 'छोटी बहू- स्वर के रंग रची', 'पुनर्विवाह', 'सरस्वतीचंद्र' सारख्या शोमध्ये दिसली. पण सृष्टी रोडेला 'इश्कबाज' या टीव्ही शोमधून ओळख मिळाली. सृष्टी देखील 'बिग बॉस 12' चा भाग बनली होती, परंतु ती 70 व्या दिवशी शोमधून बाहेर पडली होती.