सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहूल

हेच ही जोडी सांगत आहे.... 

Updated: Aug 4, 2019, 04:03 PM IST
सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहूल   title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सध्याच्या घडीला रिअॅलिटी शो आणि त्यामध्ये असणाऱ्या कलाकार मंडळींना चांगलीच लोकप्रियता प्राप्त झाली आहे. रिअॅलिटी शोच्या या ट्रेंडमध्ये अगदी सुरुवातीच्याच दिवसांपासून चर्चेत असणारा एक चेहरा म्हणजे रघु राम. 'रोडिज' फेम रघु आता अचानक प्रकाशझोतात येण्याचं कारण आहे, त्याची एक सोशल मीडिया पोस्ट. 

पत्नी नताली हिच्यासोबतचा एक फोटो रघुने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून त्याने नताली आणि त्याच्या या प्रेमाच्या नात्यात एका नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याची गोड बातमी सर्वांना दिली आहे. 'माझ्या आयुष्यातील एका मोठ्या थरारक वळणासाठी तयार होतोय...', असं कॅप्शन त्यने या फोटोला दिलं. 

रघुने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये नताली आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारा आनंदच सारंकाही सांगून जात आहे. यामध्ये नतालीने फ्लोरल प्रिंट असणारा गाऊन घातला आहे. तर, रघु कॅमोफ्लज प्रिंटच्या टी शर्टमध्ये 'सुपरकूल बाबा' होण्याच्या तयारीत चांगलाच रमल्याचं दिसत आहे. लगान बाळाचे शूज हातात घेऊन या पाहुण्यच्या येण्याची उत्सुकता आपल्याला लागली आहे, हेच ही जोडी त्यांच्या या सुरेख अशा फोटोच्या माध्यमातून सांगत आहे. 

रघुने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनीच कमेंटच्या माध्यमातून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गोवा येथे रघु आणि नतालीने लग्नगाठ बांधली होती. दोघांचेही कुटुंबीय आणि अतिशय खास अशा मित्रपरिवाराची या विवाहसोहळ्याला उपस्थिती पाहायला मिळाली होती.