बाबो! 'तिवारी- भबूती'चं लिपलॉक पाहून भाबीजीनं दिली अशी प्रतिक्रिया...

क्लिक करुन पाहा हा भुवया उंचावणारा फोटो   

Updated: Oct 29, 2020, 04:25 PM IST
बाबो! 'तिवारी- भबूती'चं लिपलॉक पाहून भाबीजीनं दिली अशी प्रतिक्रिया...
संग्रहित छायाचित्र

मुंबई : चित्रपट वर्तुळात सातत्यानं अनेक घडामोडी घडत असतात त्याचप्रमाणे आता छोट्या पडद्यावर अर्थात टेलिव्हिजन विश्वातही सध्या काही लक्षवेधी घटना घडत आहेत. याच घटनांच्या सत्रात आता लक्ष वेधत आहे ती म्हणजे 'भाबीजी घर पर है' ही मालिका.

मालेकेत मुख्य भूमिकांमध्ये दिसणारे दोन्ही अभिनेते सोशल मीडियावर त्यांच्या एका फोटोमुळं धुमाकूळ घालत आहेत. या फोटोमध्ये मालिकेत मनमोहन तिवारी ही भूमिका साकारणारा रोहिताश्व गौर आणि विभूती नारायण मिश्रा साकारणारा आसिफ शेख हे दोघंही चक्क लिपलॉक करताना दिसत आहेत. 

बसला ना तुम्हालाही धक्का? तर पाहा हा व्हायरल होणारा फोटो... 

खुद्द रोहिताश्वनेच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'अबे ये लिपलॉक कैसे हो गया बे? भभूती जी और तिवारी जी बहुत नीच लोग है... वो नाईस होता है पगली.... सही नही पकडे है'. 

सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताच अनेकांनीच त्यावर कमेंट्सची बरसात करण्यास सुरुवात केली. खुद्द या मालिकेचाच एक महत्त्वाचा भाग असणारी सौम्या टंडन हिनंही यावर तिची आश्चर्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आता या फोटोची चर्चा सुरु असतानाच मालिकेमध्ये पुढं घडणार तरी काय हाच प्रश्न चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण करत आहे.