धक्कादायक! शुटिंगदरम्यान अभिनेत्रीला कोरोनाची लागण

तात्काळ शुटिंग केलं रद्द 

Updated: Jul 5, 2020, 03:41 PM IST
धक्कादायक! शुटिंगदरम्यान अभिनेत्रीला कोरोनाची लागण

मुंबई : कोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत लाखो लोकांना झाली आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. यामध्ये तमिळ आणि तेलुगु टीव्ही स्टार, लोकप्रिय अभिनेत्री नव्या स्वामीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतचा खुलासा तिने स्वतः सोशल मीडियावर केली आहे. नव्या स्वामी हे दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील चर्चेतील चेहरा आहे. 

नव्या स्वामीने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने याबाबतचा खुलासा केला आहे. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षण म्हणजे डोकेदुखी आणि थकवा जाणवू लागला होता. तीन-चार दिवस तिला याचा त्रास जाणवू लागला आहे. तिच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला कोविड-१९ ची चाचणी करण्याचा सल्ला दिसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#staystrong #staypositive #donotpanic #covid19 #fightforcorona #gocoronago #fighttogether #morepower #thankful #navyaswamy

A post shared by Navya Swamy (@navya_swamy) on

नव्याने या व्हिडिओत म्हटलंय की, हॅलो, मला आशा आहे तुम्ही सगळे छान असाल. मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगणार आहे. मला कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांनी मला आयसोलेट होण्याचा सल्ला दिला आहे. मी माझी औषध वेळेवर घेत आहे आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसे प्रयत्न देखील करत आहे. 

त्याचप्रमाणे या व्हिडिओ तिने काही लोकांना खास आवाहन केलंय की, या मधल्या काळात मी ज्या व्यक्तींना भेटली आहे. त्यांनी स्वतःची काळजी घ्या. कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली तर लगेचच कोविड-१९ ची चाचणी करून घ्या.