मुंबई : अभिनेता अर्शद वारसीला देखील वाढीव वीजबिलाचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या संकटाचा सामना करत आहेत. अर्शद वारसीला एका महिन्याचं वीज बिल १ लाख ३ हजार ५६४ रुपये आलं आहे. वाढीव वीजबिलाविषयी त्याने ट्विटरच्या माध्यमातून आगपाखड केली होती. 'हायवे लुटारु’ अदानी यांच्याकडून आलेलं हे माझे वीज बील असं म्हणत सोशल मीडियावर आगपाखड केली होती.
ट्विटरच्या माध्यमातून आगपाखड केल्यानंतर त्याची समस्या दूर झाली आहे. परंतु ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने आदर्शच्या ट्विटला रोखठोक शब्दात उत्तर दिलं आहे. 'वाढीव वीज बिल आल्यबद्दल आम्ही तुमची चिंता समजू शकतो. शिवाय तुमची मदत करण्यास आम्ही तयार देखील आहेत. पण वैयक्तिक बदनामी सहन करणार नाही.' असं प्रत्युत्तर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदला देण्यात आलं होतं.
And yes there is a light at the end of the tunnel. Quick response from @Adani_Elec_Mum problem solved. All you have to do is contact them.... thank you ...
— Arshad Warsi (@ArshadWarsi) July 5, 2020
त्यानंतर पुन्हा अर्शदने ट्विट करत समस्या दूर झाली असल्याचे सांगितले आणि सहकार्य केल्याबद्दल आभार देखील मानले आहेत. दरम्यान अनेक दिवसांपासून वाढीव वीजबिलाने डोकं वर काढलं आहे. यात अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे,हुमा कुरेशी यांना देखील वाढीव वीजबिलाचा फटका बसला आहे.