शाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन

Thalapathy Vijay : विजय थलपतीनं मानधनाच्या बाबतीत प्रभास, शाहरुख खान, महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला देखील मागे टाकले आहे. त्यानं Leo साठी घेतलेल्या मानधनानं सगळे चक्रावले आहे. दरम्यान, त्याचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 26, 2023, 01:38 PM IST
शाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन
(Photo Credit : Vijay Instagram)

Thalapathy Vijay : दाक्षिणात्य अभिनेता विजय हा तमिळ चित्रपटसृष्टीतल लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सध्या विजय त्याच्या 'लीयो' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाचं पोस्टर आणि गाणं नो रेडी हे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात आलं. पण या गाण्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या गाण्यात ड्रग्स दाखवण्यात आल्यानं त्याच्या आणि लीयोच्या संपूर्ण टीमविरोधात एका व्यक्तीनं तक्रार दाखल केली आहे. 'लीयो' मुळे चर्चेत असणारा विजयनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं आहे, हे तुम्हाला माहित आहे का? विजयनं प्रभास, अल्लु अर्जुन, महेश बाबू आणि शाहरुख खान या सगळ्या टॉपच्या कलाकारांना मानधनाच्या बाबतीत मागे टाकले आहे.  

प्रभास, अल्लु अर्जुन आणि महेश बाबू हे कलाकारल एका चित्रपटासाठी 150 कोटी रुपये मानधन घेतात. तर थलपती विजयनं 'लीयो' या चित्रपटासाठी तब्बल 200 कोटी मानधन घेतले, असे म्हटलं जात आहे. विजयनं नक्की किती मानधन घेतले याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर विजय सक्रिय नसला तरी सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी विजय एक आहे. चर्चांनुसार, विजय या चित्रपटासाठी 175 कोटी मानधन मागत होता पण त्यानं 200 कोटी मानधन घेतले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विजयनच्या 'लीयो' या चित्रपटात मोठी कास्ट आहे. यात विजयसोबत त्रिशा कृष्णनं, संजय दत्त प्रिया आनंद, अर्जुन दास आणि मंसूर अली खान हे नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटाचं पहिलं शुटिंगचं शेड्युल्ड हे कश्मिरला झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजनं केलं आहे. विजय हा गेल्या दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.या चित्रपटानंतर विजय व्येंकट प्रभू यांच्या चित्रपटात दिसणार आहे. तर या चित्रपटाचे नाव Thalapathy 68 असे आहे. तर लोकेश लवकरच प्रभाससोबत एक नवीन चित्रपट करणार आहे. नुकताच विजयचा नेटफ्लिक्सवर वरिसू हा चित्रपट प्रदर्शित धाला. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना, आर सरथकुमार, प्रभु आणि प्रकाश राज हे देखील आहेत.

हेही वाचा : अर्जुनच्या बर्थ डे पार्टीत बेभान होऊन नाचली Malaika, इनसाईड Video समोर

लोकश विषयी बोलायचे झाले तर सिनेमॅटिक यूनिवर्सतचा हा तिसरा चित्रपट आहे. कलम हासन यांचा विक्रम आणि कार्तिती यांचा कैथी हा चित्रपट देखील त्यापैकी आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x