मुंबई : तेलगू सिनेमातील सुपस्टार पवन कल्याण काही दिवसांमध्ये राजकारणात येणार आहेत. ऑक्टोबरमध्ये तो पूर्णपणे राजकारणात अॅक्टीव असणार आहे. त्याआधी त्याचा एक फोटो ट्विटरवर चांगलाच चर्चेत आला आहे. पवन कल्याण ध्वजास्तंभासमोर गुडघ्यावर बसून ध्वजवंदन करतांना दिसत आहे.
पवन तेलगू सिनेमा आणि हिंदी सिनेमांमध्ये देखील काम करतात. ३ महिन्यापूर्वी त्यांनी जनसेना नावाचा पक्ष सुरु केला. अजून पक्ष राजकारणात सक्रीय नाही झाली. पण लवकरच ते आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामध्ये अॅक्टिव होणार आहेत.
ऑक्टोबरपर्यंत सर्व सिनेमांचं काम संपवून तो राजकारणात उतरणार आहे. जनतेच्या सेवेसाठी आता पूर्णपणे राजकारणात येणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे.