प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला पत्नीसोबत फोटो; ओळखलं का या कॉमेडी किंगला?

अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोत अभिनेता त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे. खंरतर हा त्यांच्या नात्याच्या सुरुवातीचा फोटो असल्याचं दिसत आहे. हा अभिनेता सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असून मराठी सिनेसृष्टीत त्याला कॉमेडी किंग म्हणून ओळखलं जातं.

सायली कौलगेकर | Updated: Aug 21, 2023, 12:56 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला पत्नीसोबत फोटो; ओळखलं का या कॉमेडी किंगला?  title=

मुंबई : सध्या सेलिब्रिटींचा एक नवा ट्रेण्ड सुरुये. या ट्रेण्डमध्ये  सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करतात आणि ते त्यांच्या चाहत्यांना ओळखण्याचं चॅलेंज देतात. आता याच ट्रेण्डमध्ये आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो व्हायरल होतोय. मात्र हा फोटो स्वत: अभिनेत्याने शेअर केला आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोत अभिनेता त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे. खंरतर हा त्यांच्या नात्याच्या सुरुवातीचा फोटो असल्याचं दिसत आहे. हा अभिनेता सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असून मराठी सिनेसृष्टीत त्याला कॉमेडी किंग म्हणून ओळखलं जातं.

आता एवढी हिंट दिल्यानंतर तुम्ही ओळखलंच असेल, जर तुम्ही अजूनही ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम आहे. भाऊ हा झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकतो. भाऊच्या प्रोफेनल आयुष्यासोबतच त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. सध्या अभिनेत्याचं करुन गेलो गाव हे नाटक तुफान गाजत आहे.

नुकतेच भाऊ यांनी सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये हार्ट ईमोजी शेअर केला आहे. अनेकांनी या फोटोवर लाईक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, 'खुप लकी आहे ती आई बायको आणि मैत्रीण जी तुमच्या नशिबी तुमची लक्ष्मी म्हणून तुमच्या घरी आली... माझा आवडता कॉमेडी किंग भाऊ कदम हा फक्त नाव कॉमेडीच एक ब्रँड आहे.'  तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, 'जेव्हा आपण स्वतःची जुनी फोटो पाहतो तेव्हा असं वाटतं की ती वेळ ती वय आत्ता हव असतं तर किती बरं झालं असतं..... जेवढं जगन तेवढं कमीच आहे आपलं वय खरंच माणसाची परिस्थिती माणसाची वाईट वेळ माणसाला खूप काही शिकून जाते.' तर अजून एकाने म्हटलंय, 'लक्ष्मी नारायणाचा जोडा'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते भाऊ यांच्या फोटोवर करत आहेत. भाऊ यांचं नाव कॉमेडीतील टॉप अभिनेत्यांमध्ये येतं. फू बाई फु या कार्यक्रमातून भाऊ कदम हे नाव घराघरात पोहचलं. यानंतर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून भाऊ यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. याचबरोबर सध्या भाऊ यांचं 'करुन गेलो गाव' हे नाटक सर्वत्र गाजत आहे.