मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच ती तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. प्राजक्ताने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करताच ती काहीच वेळात चर्चेत येते. नुकतंच प्राजक्ताने आस्क मी अ क्वेशन हे सत्र तिच्या चाहत्यांसोबत घेतलं. ज्यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले ज्याची उत्तर प्राजक्ताने अगदी मजेशीरपणाने दिली.
या सत्रा दरम्यान प्राजक्ताला तिच्या एका चाहत्याने विचारलं की, तुझा लूक एखाद्या इंटरनॅशनल मॉडेलपेक्षा कमी नाही. तुझे काही हॉलिवूड सिनेमासाठी प्लान्स आहेत का? चाहत्याच्या या प्रश्नावर मजेशिर पद्धत्तीने उत्तर देत प्राजक्ता म्हणाली, तुमच्या कॉम्प्लिमेंटसाठी खरंच खूप थँक्यू. मात्र आत्तातरी असा काहीच प्लान नाहीये हॉलिवूडबाबतचा. प्राजक्ताला अजूनही अनेक प्रश्न या सत्रा दरम्यान तिच्या चाहत्यांनी विचारले आहेत. या सेशनच्या निमित्ताने प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांमध्ये तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा समावेश होता.
प्राजक्ता गायकवाड ही 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरातून पोहचली होती. तिचे इन्टाग्रामवरही अनेक फॉलोवर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते.मध्यंतरी प्राजक्ता काही मालिकांमधून दिसली होती. आता ती लोकप्रिय अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.
तिनं या भुमिकेतून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई (Yesubai) यांची भुमिका केली होती. ही भुमिका तेव्हा प्रचंड गाजली होती त्यामुळे प्राजक्ता गायकवाड हे नावं येसुबाई यांच्या पात्राशी जोडलं गेलं होतं.
प्राजक्ता गायकवाडनं मराठी टेलिव्हिजनवर (marathi television) स्वत:च असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिचा फॅन फोलोईंग जगात प्रचंड आहे. त्यामुळे अनेक तरूण तसेच महिलावर्ग तिचा चाहता आहे. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून प्राजक्ताने मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. परंतु तिला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील स्वराज्यरक्षकसंभाजी या मालिकेतून. या मालिकेपासून तिला तिची एक स्वतंत्र ओळख मिळाली आणि तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं.येसूबाई प्रेक्षकांना खूप आवडली होती. प्राजक्ताच्या करिअरमधील हा महत्त्वाचा टप्पा ठरला. मालिका संपली तरी प्राजक्ताने साकारलेली येसूबाईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.