'जब हॅरी मेट सेजल'ने कमावले पहिल्या दिवशी १५.२५ कोटी रुपये

अभिनेता शाहरूख खान आणि अनुष्का शर्माचा बहुचर्चित हॅरी मेट सेजल हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी १५.२५ कोटी रुपये कमवलेत.

Updated: Aug 6, 2017, 12:47 PM IST
'जब हॅरी मेट सेजल'ने कमावले पहिल्या दिवशी १५.२५ कोटी रुपये title=

मुंबई : अभिनेता शाहरूख खान आणि अनुष्का शर्माचा बहुचर्चित हॅरी मेट सेजल हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी १५.२५ कोटी रुपये कमवलेत.

इम्तियाज अली यांनी 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपट दिग्दर्शित केलाय. या चित्रपटात मध्ये शाहरूख 'हरिंदर सिंह नेहरा' उर्फ 'हॅरी' आणि अनुष्का ही 'सेजल झवेरी' च्या भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहरुख आणि अनुष्का या दोघांनीही उत्तम अभिनय केलाय.

शाहरूख आणि अनुष्का यांनी या आधीही काही चित्रपटात एकत्र काम केले होते. 'रब ने बना दी जोड़ी', 'जब तक है जान' त्यानंतर 'जब हॅरी मेट सेजल' हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरूखने टूर गाईडची तर अनुष्काने एका गुजराती मुलीची भूमिका साकारलीये.