USच्या नेव्हीने गायलं शाहरूखच्या 'स्वदेस' सिनेमातील गाणं

व्हीडिओला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Updated: Mar 31, 2021, 04:27 PM IST
USच्या नेव्हीने गायलं शाहरूखच्या 'स्वदेस' सिनेमातील गाणं  title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या नेव्हीचा एक व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकीतील नौसैनिक अभिनेता शाहरूख खानच्या 'स्वदेस' सिनेमातील 'ये देस है तेरा, स्वदेस है मेरा' गाणं म्हणताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या तुफान चर्चेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे हा व्हीडिओ शाहरूखने देखील रीट्विट केला आहे. व्हीडिओ 27 मार्चचा असून युएस नेव्हीच्या एका कार्यक्रमातील आहे. या  व्हीडिओला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

तरनजीत सिंह सिंधू यांनी ट्विटरवर व्हीडिओ शेअर करत 'ये जो बंधन है जो कभी टूट नही सकता' असं लिहिलं आहे. 

शाहरूखने त्यांचं ट्विट रिट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत. व्हीडिओ रिट्विट करत त्याने 'व्हीडिओ शेअर करण्यासाठी तुमचे आभार..' असं म्हणतं त्याने सिनेमाच्या अन्य लोकांचं देखील आभार मानले आहेत. स्वदेस हा सिनेमा 2004 साली प्रदर्शित झाला होता. 'ये देस है तेरा, स्वदेस है मेरा' हे गाणं ए.आर. रेहमान यांच्या आवाजात स्वरबद्ध केलं होतं. 

या व्हीडिओला आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहे. या व्हीडिओने पुन्हा सिद्ध केलं आहे की, बॉलिवूड सिनेमांमधील गाण्यांची जादू संपूर्ण जगात आहे.